News Flash

अभिनेत्री कंगना रणौतला झाला करोना

सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली माहिती.

करोनाच्या दुसऱ्या लाटेत मृत्यूचं अक्षरशः तांडवच बघायला मिळत आहे. देशाच्या विविध भागात करोनाने हातपाय पसरले असून, रुग्णसंख्येचा तोल सांभाळताना आरोग्य व्यवस्था ढगमगताना दिसत आहे. करोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा सामान्य जनतेपासून सेलिब्रिटींपर्यंत सगळ्यांवर परिणाम होत आहे. अनेक सेलिब्रिटींना करोनाची लागण झाली. आता अभिनेत्री कंगना रणौतला देखील करोना व्हायरसचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे.

कंगनाने करोना झाल्याची माहिती सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली आहे. स्वत:चा फोटो शेअर करत तिने ‘गेल्या काही दिवसांपासून माझ्या डोळ्यांची जळजळ होत होती आणि मला अशक्तपणा जाणवत होता. मी हिमाचलला जाण्याचा विचार करत होते म्हणून काल करोना चाचणी करुन घेतली. आज सकाळी माझ्या चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. मी स्वत:ला क्वारंटाइन करुन घेतले आहे’ असे तिने कॅप्शनमध्ये म्हटले आहे.

आणखी वाचा : कंगनाच्या बहिणीचा अभिनेत्याशी ‘पंगा’, म्हणाली ‘तू तर पृथ्वीवरील ओझं’

 

View this post on Instagram

 

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

यापूर्वी अभिनेत्री आलिया भट्ट, रणबीर कपूर, विकी कौशल, कतरिना कैफ, विक्रांत मेसी, कार्तिक आर्यन आणि इतर काही कलाकारांना करोना झाला होता. आता त्यांच्या पाठोपाठ अभिनेत्री कंगना रणौतला देखील करोना झाल्याचे समोर आले आहे.

देशात दररोज हजारो रुग्णांचा मृत्यू होत असून, गेल्या २४ तासांतील आकडेवारी प्रत्येकाचीच झोप उडवणारी आहे. अवघ्या २४ तासांच्या कालावधीत चार हजारांहून अधिक रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहे. ही देशातील एका दिवसातील आतापर्यंतची मृतांची उच्चांकी नोंद असून, २४ तासांत चार लाखांहून अधिक करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 8, 2021 11:04 am

Web Title: kangana ranut tested corona positive avb 95
Next Stories
1 ‘त्या सर्व अफवा…’, अनुपम खेर यांचा पत्नी किरण यांच्या प्रकृतीबाबत खुलासा
2 “इतरांप्रमाणेच करोनामुळे माझ्यावरही आर्थिक संकट”, ‘CID’च्या इन्स्पेक्टर अभिजीतचा खुलासा
3 “छोटा राजनला ऑक्सिजन आणि बेड मिळेल अशी आशा आहे”; राम गोपाल वर्मा यांच्या ट्विटमुळे नेटकरी भडकले
Just Now!
X