News Flash

पाहा एका भूमिकेसाठी कंगनाला काय काय करावं लागत आहे….

कंगना सध्या 'तेजस' या चित्रपटात हवाई दलातल्या पायलटची भूमिका साकारत आहे.

कंगना रणौत आपल्या आगामी चित्रपटासाठी जोरदार तयारी करताना दिसत आहे. तिने ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तिची या चित्रपटातल्या भूमिकेसाठीची मेहनत दिसत आहे. तिच्या ‘तेजस’ या आगामी चित्रपटात ती भारतीय वायूदलातल्या एका पायलटची भूमिका साकारताना दिसणार आहे.

कंगनाने सांगितलं की, तिच्या या भूमिकेसाठी ती खूप कठोर आर्मी ट्रेनिंग घेत आहे. मुंबईमधल्या एका स्टुडिओमध्ये हे ट्रेनिंग सुरु आहे.

ती म्हणते की, फक्त वर्दी घालणं एवढंच पुरेसं नाही, तर त्यांना कोणत्या परिस्थितीतून जावं लागतं, त्यांचा स्ट्रगल हे सगळं अनुभवणं गरजेचं आहे. हे लक्षात यायला हवं की कणखर शरीर बनायला काय लागतं. ती हेही म्हणाली की, ती वर्दी घालण्याच्या योग्यतेचं ते शरीर बनायला हवं.

या आठवड्यापासूनच कंगनाने या चित्रपटासाठीच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. ती कायम आपल्या सोशल मीडिया अकाऊंट्सवरून या चित्रपटाबद्दल पोस्ट्स शेअर करत असते. तिने नुकतंच या चित्रपटाचा दिग्दर्शक सर्वेश मेवारा याच्या स्ट्रगलबद्दल सांगितलं आहे.

आपल्या ट्विटमध्ये ती म्हणते, “या चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक सर्वेश मेवारा यांना आपला पहिला चित्रपट मिळवण्यासाठी एका दशकाहून अधिक काळ स्ट्रगल करावा लागला आहे. काल या चित्रपटाच्या शुटिंगच्या पहिल्या दिवशी त्याची आई भावूक झाली. ते पाहून मला माझ्या परिवाराची आठवण झाली. बाहेरच्या लोकांना या क्षेत्रात येणं फार अवघड असतं. सर्वेशला सॅल्युट.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 5, 2021 1:52 pm

Web Title: kangana shared her workout video for tejas vsk 98
Next Stories
1 कलाकारांची फौज असणारा ‘झिम्मा’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला
2 ‘येऊ कशी तशी मी नांदायला’मधील ‘त्या’ दृश्यावर सोशल मीडियावर होतेय टीका
3 हे कलाकार होणार आईबाबा, या वर्षात देणार आहेत गुडन्यूज
Just Now!
X