News Flash

कंगनाचा करण जोहरवर निशाणा, म्हणाली…

यापूर्वी ही कंगनाने करण जोहरला सुनावले होते.

बॉलिवूड चित्रपट निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेता करण जोहरला सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले जात आहे. काही दिवसांपूर्वीच करणने एक पुस्तक लाँच करत असल्याचे सोशल मीडियाद्वारे सांगितले होते. हे पुस्तक पालकत्वावर आधारित असून कथा त्याच्या मुलांच्या जीवनावर आधारित असल्याचे त्याने म्हटले होते. पण करण जोहरच्या या ट्विटनंतर त्याला पुन्हा ट्रोल करण्यात आले. तसेच अभिनेत्री कंगना रणौतने देखील करणवर निशाणा साधला.

कंगनाने करणच्या ट्विवटला उत्तर दिले आहे. करण जोहर, आदित्य चोप्रा, महेश भट्टसारख्या मूव्ही माफियांमुळे सुशांतचा मृत्यू झाला, त्यांनी एका कुटुंबातील मुलाचा जीव घेतला आणि करण आपल्या स्वत:च्या मुलांचे प्रमोशन करतोय. हे लज्जास्पद आहे या आशयाचे ट्विट करत कंगनाने करणवर निशाणा साधला.

कंगनाचे हे ट्विट काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर अनेकांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली. यापूर्वी ही कंगनाने करण जोहरवर अनेक आरोप केले होते. त्याच बरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करण जोहरला अटक करण्याची मागणी देखील केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 2, 2020 3:34 pm

Web Title: kangana target karan johar after launching book on children avb 95
Next Stories
1 “तिला कामच करायचं नाहीये”; शिल्पा शिंदेच्या आरोपांवर अभिनेत्याचं प्रत्युत्तर
2 ‘स्वराज्यजननी जिजामाता’ मालिकेत होणार डॉ. अमोल कोल्हेंची एण्ट्री; साकारणार महत्त्वपूर्ण भूमिका
3 विद्या बालनं ट्रोलर्सवर भडकली; रियावर टीका करणाऱ्यांना केला सवाल
Just Now!
X