News Flash

कंगना रणौतची रणवीर सिंग आणि रणबीर कपूरला विनंती; म्हणाली…’अशी अफवा पसरली आहे की…’

कंगनाने दिला रणबीर, रणवीरला खोचक सल्ला

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. यात आता ड्रग्स हा नवा मुद्दा समोर आला असून बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा या मुद्द्यावरुन चर्चेला उधाण आलं आहे. यातच काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीने कंगना रणौतने बॉलिवूडमध्ये ड्रग्सचं मोठं रॅकेट आहे असं म्हणत अनेकांच्या नजरा वेधून घेतल्या होत्या. त्यानंतर आता तिने ट्विट करत रणवीर सिंह, रणबीर कपूर या दिग्गज अभिनेत्यांनीदेखील ब्लड टेस्ट करावी असं म्हटलं आहे. त्यामुळे आता कंगनाने पुन्हा एकदा बॉलिवूड कलाकारांवर निशाणा साधल्याचं दिसून येत आहे.

“रणवीर सिंह, रणबीर कपूर, अयान मुखर्जी या दिग्गज अभिनेत्यांनीदेखील त्यांची ब्लड टेस्ट करावी असं मला वाटतं. कारण सध्या रणवीर, रणबीर या अभिनेत्यांना कोकिनचं व्यसन आहे अशी अफवा पसरली आहे. त्यामुळे माझी विनंती आहे तुम्ही ड्रग्स टेस्ट करुन घ्या. जर त्यांच्या सगळ्या टेस्ट नॉर्मल आल्या. तर हेच कलाकार इतरांसाठी प्रेरणास्त्रोत ठरु शकतील, असं ट्विट कंगनाने केलं आहे. विशेष म्हणजे या ट्विटमध्ये तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनादेखील टॅग केलं आहे.

आणखी वाचा- कंगनाचा करण जोहरवर निशाणा, म्हणाली…

दरम्यान, यापूर्वी कंगनाने अनेक वादग्रस्त वक्तव्य करुन अनेकांच्या नजरा वेधून घेतल्या आहेत. जर बॉलिवूडमध्ये ड्रग्स टेस्ट केली तर असंख्य कलाकारांना तुरुंगात जावं लागेल असं तिने काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं. तिच्या या वक्तव्यानंतर अनेक सेलिब्रिटींनी तिच्यावर टीकास्त्र डागलं होतं. अभिनेत्री रवीना टंडननेदेखील तिला खडेबोल सुनावले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 2, 2020 4:25 pm

Web Title: kangana want ranbir vicky blood test done drugs taken ssj 93
Next Stories
1 “या पैशांनी गरीबांची मदत करा”; नव्या कारमुळे बिग बींना केलं जातय ट्रोल
2 कंगनाचा करण जोहरवर निशाणा, म्हणाली…
3 “तिला कामच करायचं नाहीये”; शिल्पा शिंदेच्या आरोपांवर अभिनेत्याचं प्रत्युत्तर
Just Now!
X