28 September 2020

News Flash

बॉलिवूड इंडस्ट्री सलमानची चापलूसी करण्यात व्यग्र- कंगनाच्या बहिणीचा टोला

रंगोलीने तिच्या ट्विटर खात्यावर सलमानच्या भारत चित्रपटासंबंधी ट्विट केले आहे

प्रत्येक भूमिकेला न्याय देणारी अभिनेत्री म्हणजे कंगना राणौत. कंगना आणि तिची बहिण रंगोली चंडेल त्यांच्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असता. कंगना आणि रंगोली बॉलिवूडमधील विविध मुद्यांवर आपली मते मांडत असतात. पण बऱ्याच वेळा त्या दोघीही त्यांच्या वक्तव्यामुळे ट्रोलच्या शिकार होतात. नुकताच प्रदर्शित झालेल्या सलमान खानच्या ‘भारत’ चित्रपटासंबंधी देखील रंगोलीने तिचे मत मांडले आहे.

रंगोलीने तिच्या ट्विटर खात्यावर सलमानच्या भारत चित्रपटासंबंधी ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये रंगोलीने सलमानसह बॉलिवूडमधील इतर कलाकरांवर देखील टिका केली आहे. तिचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

‘बॉलिवूड इंडस्ट्री सलमान खानची चापलूसी करण्यात व्यग्र आहेत. त्यांच्या या चापलूसीचे नेतृत्व करण जोहर करत आहे. समोरुन चुगली आणि मागून चापलूसी कशी करतात हे आम्हाला देखील शिकायचे आहे’ असे रंगोलीने ट्विटमध्ये लिहिले आहे.

‘भारत’ चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी सलमानने त्याच्या बॉलिवूडमधील खास मित्रमैत्रीणींसाठी स्पेशल स्क्रिनिंग ठेवले होते. दरम्यान अभिनेता शाहरुख खान, मौनी रॉय आणि इतर अनेक कलाकरांनी हजेरी लावली होती. ‘भारत’ हा चित्रपट १९४७ सालच्या फ्लॅशबॅकमध्ये रंगविण्यात आलेला आहे. या चित्रपटामध्ये भारताचे होणारे विभाजन, त्या काळातील जनतेची परिस्थिती आणि साऱ्यामध्ये भारतचे खुलणारे प्रेम आणि त्याच्या जीवनाशी सुरु असलेला संघर्ष रंगविण्यात आला आहे. यामध्ये रोमान्स, कॉमेडी, ड्रामा, अॅक्शन या सगळ्यांचा भरणा आहे.

‘भारत’ हा चित्रपट २०१४ साली प्रदर्शित झालेल्या “Ode To My Father” या दक्षिण कोरियन चित्रपटावर आधारलेला आहे. यामध्ये दिशा पटानी, नोरा फतेही, तब्बू, सुनील ग्रोव्हर यांच्याही भूमिका आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 6, 2019 1:35 pm

Web Title: kanganas sister rangoli chandel talks about bharat movie avb
Next Stories
1 ‘सूर्यवंशी’साठी अक्षयने केला जोखमीचा स्टंट
2 मुंबईतील मशिदीबाहेर चेहरा झाकून कार्तिक-साराने काढला सेल्फी
3 Video: अक्षय कुमारला भेटण्यासाठी अनुपम यांचा अनोखा स्टंट
Just Now!
X