21 January 2018

News Flash

दोन मुलांचा पिता असलेल्या अभिनेत्यासोबत कंगनाला करायचे होते लग्न?

कालांतराने या ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: September 7, 2017 6:56 PM

अभिनयाची ‘क्वीन’ म्हणून बॉलिवूडमध्ये प्रसिध्द असलेली कंगना रणौत पार्ट्या अथवा पुरस्कार सोहळ्यांना फार कमी उपस्थिती लावते. प्रसारमाध्यमांच्या गोतावळ्यातही ती फार दिसत नाही. असे असले तरी सर्वात जास्त चर्चेत राहणारी अभिनेत्री म्हणून तिचेच नाव घेतले जाते. कंगनाशी निगडीत कोणताही वाद असला आणि त्याची चर्चा झाली नाही असे होणे अशक्यच. तिच्या आणि अभिनेता हृतिकच्या अफेअर्सची चर्चा ताजी असतानाच तिच्या आणखी काही अफेअर्सने डोकं वर काढलं आहे.

सलमानची एक्स मॅनेजर झाली प्रियांका चोप्राची नवी मॅनेजर

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पूर्वाश्रमिचे प्रियकर आणि हृतिकसोबतच्या ई-मेलवरी वादावर कंगना मनमोकळेपणाने बोलली. याशिवाय कंगनाने महिला आयोगावरही ताशेरे ओढले. या सगळ्याच गोष्टींवर भरभरून बोलताना अन्य एका प्रसिध्द अभिनेत्यासोबतच्या तिच्या तथाकथित अफेअर विषयी बोलण्याचे तिने काळजीपूर्वक टाळले. काही वर्षांपूर्वी ‘स्टारडस्ट’ मासिकाने यावर बातमी केली होती.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना साधारण २००९-१० ची आहे. याआधी कंगनाने अनेक चांगल्या सिनेमांमध्ये काम केले. तिच्या अभिनयाची प्रशंसाही केली जात होती. पण असे असतानाही तिच्या नावाला पाहिजे तसे महत्व प्राप्त होत नव्हते. पण ‘वन्स अपॉन टाइम इन मुंबई’ या सिनेमाने सगळी गणितं बदलली. या सिनेमातील मोठ्या पडद्यावरचा तिचा वावर लक्षवेधी असा होता. याच सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान तिची आणि अजयची ओळख झाली.

कालांतराने या ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले. त्या दोघांमधील जवळीक एवढी वाढली की अजयने त्याच्या ‘रास्कल’ आणि ‘तेज’ सिनेमांमध्ये कंगनाला घेण्यासाठी दिग्दर्शकाकडे खास शिफारस केली. या दोघांना एकमेकांसोबत वेळ घालविणे एवढे आवडायचे की, अजय दरदिवशी चित्रीकरणाला जाताना कंगनाला चित्रीकरणस्थळी नेण्यासाठी तिच्या घरी यायचा. ते एकत्र जेवायचे आणि चित्रीकरण संपले की अजय परत तिला घरी सोडायला जायचा.

सगळं काही सुरळीत सुरू असताना या नात्यात कंगना अधिक गुंतत गेली आणि अजयला मात्र वास्तवाचे भान होते. कंगनाला अजयकडून लग्नाचे वचन हवे होते. पण आपले लग्न झाले असून आपल्याला दोन मुलं आहे हे कारण त्याने पुढे केले. कंगना कोणत्याच गोष्टी ऐकून घेण्यास तयार नव्हती. एका रात्री मद्यधुंद अवस्थेत ती अजयला लग्नासाठी विनंती करत होती. त्यावेळी अजयने कंगनापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. या प्रकरणानंतर अजय आणि कंगनामध्ये दुरावा आला जो आजतागायत कायम आहे.

First Published on September 7, 2017 6:56 pm

Web Title: kangna ranaut had a hidden affair with married actor ajay devgn during shooting of once upon a time in mumbai
  1. No Comments.