News Flash

कंगनाच्या धमाकेदार एण्ट्रीने ‘रंगून’ गेला 2 MAD चा मंच

'बन्नो तेरा' या गाण्यावर कंगनाच्या लावणीचा तडका

कंगना रणौत '2 MAD' च्या मंचावर आली तेव्हा...

कलर्स मराठीवर नुकत्याच सुरु झालेल्या ‘2 MAD–महाराष्ट्राचा अस्सल डान्सर’ या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळतो आहे. या कार्यक्रमातील स्पर्धकांच्या नृत्यातील वेडेपणाने अवघ्या महाराष्ट्राला वेड लावले आहे. या कार्यक्रमातील स्पर्धक नेहेमीच आपल्या प्रेक्षकांना आणि परीक्षकांना आपल्या सुंदर नृत्याद्वारे सरप्राईझ देत असतात, पण यावेळेस मंच्यावर स्पर्धकांनाच एक सरप्राईझ मिळालं. ‘क्वीन’, ‘तनु वेड्स मनु’ अशा सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी आपल्या सगळ्यांच्या लाडक्या ‘क्वीन’ कंगनाची ‘2 MAD’ च्या सेटवर धम्माकेदार एन्ट्री झाली.

‘2 MAD’च्या या खास एपिसोडमध्ये स्पर्धकांनी कंगनाच्या गाण्यावर डान्स करून तिला सरप्राईझ दिलं. महाराष्ट्रात असलेले भन्नाट कलागुण पाहून कंगनाही थक्क झाली. ‘2 MAD – महाराष्ट्राचा अस्सल डान्सर’चा कंगना रणौतसोबतचा हा ‘रंगून’ विशेष भाग तुम्हाला २१ फेब्रुवारीला कलर्स मराठीवर पाहता येणार आहे.

कंगनाने कार्यक्रमामध्ये मराठी भाषेमध्ये बोलण्याचाही प्रयत्न करत उपस्थितांची मने जिंकली. स्पर्धकांनी कंगना बरोबर बऱ्याच गंमती जमती देखील केल्या ज्या तुम्हाला या एपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहे. ‘2 MAD – महाराष्ट्राचा अस्सल डान्सर’च्या सेटवर येऊन कंगना खूपच खुश होती त्यावर ती म्हणाली, “मी खूप खुश आहे या मंच्यावर येऊन. स्पर्धक खूप उत्साही आहेत, त्यांच्या डान्समध्ये एक प्रकारचे वेड आहे.. हा एक डान्स शो आहे आणि डान्स म्हटलं कि, वेडेपण आलंच. माझ्या मते प्रत्येक कलात्मक कामामध्ये वेडेपण आणि एक प्रकारचा आवेग असावाच लागतो’.

unnamed-2

या कार्यक्रमात विशेष म्हणजे कंगनाने स्टेजवर येऊन थोडी लावणीची झलक देखील प्रेक्षकांना दाखवली, जी तुम्हाला बघायला मिळणार आहे 2 MAD मध्ये २१ फेब्रुवारीला. मंगेश पटणे आणि आर्या डोंगरे यांनी क्वीन या सिनेमातील “लंडन ठुमकता” या लोकप्रिय गाण्यावर कथकली नृत्यप्रकार सादर केला. या गाण्यावर कथकली या नृत्यप्रकारामध्ये देखील नृत्य सादर होऊ शकत हे बघून सगळ्यांनाच खूपच आश्चर्य वाटले. या विशेष भागामध्ये सगळ्याच स्पर्धकांनी त्यांच्या नृत्य-कौशल्याने कंगनाला थक्क केले यात शंका नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 17, 2017 4:07 pm

Web Title: kangna ranaut to promote her upcoming movie rangoon in marathi dance reality show 2 mad
Next Stories
1 पाकिस्तानी अभिनेत्री सबा कमर सलमानला म्हणाली, ‘छिछोरा’
2 बाबा गुरमीत राम रहीमच्या चित्रपटाने ‘जॉली’ अक्षयलाही टाकले मागे
3 ब्लॉग : मग चित्रपट पाहायला फारसे काहीच शिल्लक राहत नाही…
Just Now!
X