करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे भारतात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. रुग्ण संख्या जलद वाढत असल्याने आरोग्य सुविधांवरील ताण वाढतोय. बेडस् आणि ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागतोय. सोशल मीडियावरून अनेक जण मदतीसाठी पुढे येत आहे. तर अनेकजण प्रशासनावर टीका करत आहेत.

नुकतच लोकप्रिय लेखक चेतन भगत याने एक ट्विट करत सरकरवर सवाल उपस्थित केले होते. भारत मॉर्डना आणि फायझर या लसींची आयात का करत नाही ? असा प्रश्न विचारत त्याने सरकारने परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घ्यावं असं म्हंटलंय. मात्र चेतन भगतच्या या ट्विटवरून बॉलिवूडची क्विन कंगना रणौत हिने निशाणा साधला आहे.

चेतन भगत त्याच्या ट्विटमध्ये म्हणालाय, “फायझर आणि मॉडर्ना उत्तम लसी आहेत. डिसेंबर 2020 पासून त्या उपलब्ध आहेत. त्या अजूनही भारतात उपलब्ध का नाही? उत्तम लसीसाठी आपली पात्रता नाही का? परदेशातून आपण युद्ध साहित्य खरेदी करत नाही का? ही परिस्थिती युद्धासारखी नाही का? लस इथे आणि इथेच बनवणं गरजेचं आहे का? ” असं ट्विट करत चेतन भगतने सरकरावर टीका केली आहे. गेल्या काही दिवसात लसींच्या तुडवड्यावरून निर्माण झालेल्या स्थितीवर त्याने ही पोस्ट केली आहे.

वाचा: कंगना रणौतने थेट अमेरिकेवर साधला निशाणा, “लाज वाटते…मराहामारीच्या काळात तुम्ही..”

मात्र चेतनच्या या पोस्टनंतर अभिनेत्री कंगना रणैतने निशाणा साधला आहे. ती म्हणाली, “कोण म्हणालं के बेस्ट आहेत? माझे असे काही मित्र आहेत ज्यांनी फायझरची लस घेतली आणि त्यांना ताप आणि अंगदुखीचा त्रास सहन करावा लागला. तुम्ही भारत आणि भारतीयांचा द्वेष करणं थांबवाल का? संपूर्ण जगात आपल्या लसीची मागणी होतेय. आत्मनिर्भर भारत होण्यामागचं कारण अर्थव्यवस्थेला गती देणं आहे. परजीवी बनणं बंद करा.” या शब्दात कंगनाने चेतनचा समाचार घेतला आहे.

कंगनाने नुकताच एक व्हिडीओ शेअर करत लसीकरण करून घेण्याचं आवाहन केलं आहे. यात तिने लोकांना लसी संबंधित अफवांना बळी पडू नका असं सांगितलं आहे.