News Flash

मोठ्या ब्रेकनंतर ‘ही’अभिनेत्री करणार आहे कमबॅक

बाळासाठी घेतला होता मालिकांमधून ब्रेक, आता दिसणार नव्या रुपात

हिंदी मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री कनिका माहेश्वरी हिने काही काळ छोट्या पडद्यावरून विश्रांती घेतली होती. पण आता ती दमदार कमबॅक करण्यासाठी सज्ज झाली आहे. यावेळी तिचा अंदाजही काहीसा निराळा असणार आहे.

कनिकाने आपल्या बाळासोबत राहता यावं यासाठी कामातून ब्रेक घेतला होता. पण आता दीर्घ काळच्या विश्रांतीनंतर ती आता मालिकांमध्ये परत दिसणार आहे.’क्यों उत्थे दिल छोड आये’ या मालिकेत ती एका विधवेची भूमिका साकारणार आहे. आणि विशेष म्हणजे यावेळी ती अधिक फिट आणि तरुण दिसत आहे. तिने सांगितलं की, “लॉकडाऊनच्या काळात एकही दिवस असा नव्हता की जेव्हा मी व्यायाम केला नाही. मी कधीकधी नुसता डाळभात खायचे पण मी व्यायाम चुकवला नाही. हे सोपं नव्हतं. या काळात मी माझ्या डाएटवर लक्ष दिलं.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Kanika Maheshwari (@kanicamaheshwari)

माझ्या या फिटनेसचा प्रवास शारिरीकपेक्षा मानसिक अधिक होता. त्यामुळे मी आधी मनाने फिट झाले आणि नंतर शरीराने, असंही ती म्हणाली. आपल्यावर होणाऱ्या टीकेला आपण सकारात्मक पद्धतीनं स्वीकारल्याचंही तिने सांगितलं. ती म्हणाली की, “टीकेचा सामना करण्याचे दोन मार्ग आहेत. एक म्हणजे तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करून पुढे जायला शिका किंवा तुम्ही त्या टीकेचा सामना करा. मी तेच केलं आणि त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला. तुमच्यावर होणारी टीका कारात्मक पद्धतीने स्वीकारा आणि मग बघा तुमच्यात कसे बदल घडतात ते.”

कनिकाने या पूर्वी ‘कहानी घर घर की’, ‘राजा की आयेगी बारात’, ‘कभी आए ना जुदाई’, ‘विरासत’, ‘गीत हुई सबसे पराई’, ‘दिया और बाती हम’ या मालिकांमध्ये काम केलं आहे. ‘दिया और बाती हम’ या मालिकेच्या सिक्वेलमध्येही ती काम करत होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 2, 2021 5:46 pm

Web Title: kanica maheshwari comeback after a log break from serials vsk 98
Next Stories
1 राखीच्या आईला भेटायला गेला विकास गुप्ता, व्हिडीओ पाहून चाहते भावूक
2 ‘स्वेटशर्ट रूबीनाकडून भाड्याने घेतले की चोरी केले?’ राहुल वैद्य ट्रोलर्सच्या निशाण्यावर
3 हार्दिक जोशीच्या कुटुंबीयांनी केलं नव्या सदस्याचं स्वागत
Just Now!
X