09 April 2020

News Flash

Coronavirus : कनिका कपूरचा तिसरा रिपोर्टही आला पॉझिटिव्ह

कनिकाच्या पहिल्या दोन रिपोर्ट्सवर तिच्या कुटुंबियांनी शंका उपस्थित केली होती.

गायिका कनिका कपूरची तिसऱ्यांदा करोना विषाणूची चाचणी करण्यात आली. तिसऱ्यांदा हा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार कनिकाच्या पहिल्या दोन चाचणींच्या रिपोर्टवर तिच्या कुटुंबियांनी शंका उपस्थित केली होती. म्हणून तिची तिसऱ्यांदा चाचणी करण्यात आली. मात्र ही चाचणी देखील पॉझिटिव्ह आली आहे. सध्या कनिकाची प्रकृती स्थिर आहे. मंगळवारी कनिकाची तिसऱ्यांदा चाचणी करण्यात आली. यावेळी कनिकाच्या शरीरात करोना व्हायरसचा हाय डोस आढळला.

कनिकाची पहिल्यांदा चाचणी केल्यावर आलेल्या रिपोर्टमध्ये तिचे वय आणि लिंग यांची माहिती चुकीची देण्यात आली होती. त्या रिपोर्टमध्ये कनिकाचे वय २८ वर्षे व लिंग महिला ऐवजी पुरुष लिहिण्यात आलं होतं. त्यामुळे या रिपोर्टवर तिच्या कुटुंबीयांनी शंका उपस्थित केली होती.

रुग्णालयात चांगल्या सुविधा मिळत नसल्याची तक्रार कनिकाने केली होती. मात्र आम्ही रुग्णांना सर्वोत्तम सेवा पुरवत असल्याचं रुग्णालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. किंबहुना सेलिब्रिटी आहे म्हणून त्यांनी डॉक्टरांना त्रास न देण्यापेक्षा सहकार्य करावं, असं रुग्णालयाकडून सांगण्यात आलं.

दुसरीकडे कनिकाच्या संपर्कात आलेल्या २६६ जणांचा शोध घेण्यात आला. त्यांच्यापैकी ६० हून अधिक नमुने तपासले गेले. त्या सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. या २६६ लोकांपैकी जर कोणात करोना विषाणूची लक्षणे दिसली तर आणखी नमुने तपासले जातील, असंही ते म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 25, 2020 1:28 pm

Web Title: kanika kapoor coronavirus tests positive 3rd time mppg 94
Next Stories
1 तुला करोना तर झाला नाही ना?; मराठी अभिनेत्रीला येत आहेत फोन
2 “भावा तू तर नजरेनेच एखाद्याला घायाळ करशील”; अनुराग कश्यपने घेतली फिरकी
3 २१ दिवसांचे लॉकडाउन ऐकून स्वरा भास्करला कोसळल रडू, म्हणाली…
Just Now!
X