करोना विषाणूचे संक्रमण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. देशभरात आतापर्यंत हजारो लोकांना या प्राणघातक विषाणूची लागण झाली आहे. यामध्ये सर्वसामान्य लोकांपासून अगदी सेलिब्रिटींपर्यंत, समाजातील सर्व स्थरातील लोकांचा सामावेश आहे. परंतु यामध्ये गायीका कनिका कपूरचे प्रकरण सर्वाधिक चर्चेत राहिले. लंडनहून परतलेल्या कनिकाला करोनाची लागण झाली होती. उपचारानंतर आता ती बरी झाली आहे. मात्र डॉक्टरांनी तिचे प्लाझ्मा सेल्स घेण्यास नकार दिला आहे.

अवश्य पाहा – PHOTO : करोनामुळे अभिनेत्री झाली बेरोजगार; कमबॅक करण्याआधीच मालिका बंद

ई टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ब्लड ट्रान्सफ्युजन औषध विभागाच्या अध्यक्षा डॉक्टर तुलीका चंद्रा यांनी कनिकाचे प्लाझ्मा सेल्स न घेण्यामागचे कारण सांगितले आहे. कनिकाच्या कुटुंबाचा वैद्यकीय इतिहास पाहून हा नकार देण्यात आला आहे. परंतु याबद्दल अधिक माहिती देण्यास त्यांनी नकार दिला. त्यांच्या मते नियमानुसार ही माहिती जाहीर करता येणार नाही.

अवश्य वाचा – “देवा आमच्यावर कृपा कर”; मोदींच्या भाषणाचा अभिनेत्याने घेतला धसका

करोना विषाणूच्या संसर्गातून बरी झालेली व्यक्ती पुढच्या १४ दिवसांपर्यंत रक्तदान करु शकते. या व्यक्तीच्या शरीरात करोनाशी लढणारे antibody तयार होतात. यांचा वापर इतर लोकांना बरं करण्यासाठी केला जाऊ शकतो. या उपचाराला ‘प्लाझ्मा थेरपी’ असं म्हणतात. या थेरपीसाठी करोनामधून मुक्त झालेले अनेक लोक रक्तदान करत आहेत. परंतु या रक्तदानास कनिका कपूरला मात्र परवानगी देण्यात आलेली नाही.