News Flash

कौतुकास्पद: अभिनेत्याने विवाहानंतर भेट दिली राज्यघटनेची प्रत

सहसा सेलिब्रिटीचा विवाहसोहळा म्हटला की झगमगाट, गाणी, डान्स या गोष्टी पाहायला मिळतात. मात्र चेतनचं लग्न या सर्वांपासून हटके होतं.

विनोबा भावे आश्रमात हा विवाहसोहळा पार पडला.

‘मायना’ चित्रपट फेम कन्नड अभिनेता चेतन नुकताच विवाहबंधनात अडकला. २ फेब्रुवारी रोजी बेंगळुरू येथे सामाजिक कार्यकर्ती मेघा हिच्याशी त्याने लग्नगाठ बांधली. सहसा सेलिब्रिटीचा विवाहसोहळा म्हटला की झगमगाट, गाणी, डान्स या गोष्टी पाहायला मिळतात. मात्र चेतनचं लग्न या सर्वांपासून हटके होतं. या लग्नात आलेल्या प्रत्येक पाहुण्याला चेतन आणि मेघाकडून एक खास भेट देण्यात आली. ही खास भेट म्हणजे राज्यघटनेची प्रत.

चेतन-मेघाची विवाहनोंदणी ही विशेष विवाह कायद्यांतर्गत करण्यात आली कारण या दोघांचाही धार्मिक विधींवर विश्वास नाही. ट्रान्सजेंडरच्या हक्कांसाठी लढणारे अक्कई पद्मशाली यांच्या साक्षीने या दोघांनी सहजीवनाच्या आणाभाका घेतल्या. घटनात्मक मूल्यांवर असलेल्या ठाम विश्वासाने या दोघांना एकत्र आणलं. त्यामुळे विवाहाला उपस्थित राहिलेल्यांना राज्यघटनेची प्रत देणं ही अत्यंत योग्य भेट ठरेल, असा त्यांनी ठरवलं.

आणखी वाचा : मराठी अभिनेत्रीने बांधली मल्याळम अभिनेत्याशी लग्नगाठ

बेंगळुरूच्या विनोबा भावे आश्रमात हा पुरोगामी विवाहसोहळा पार पडला. “वंचित मुलं आणि आश्रमातील वयोवृद्धांच्या साक्षीने पार पडलेल्या या अर्थपूर्ण सांस्कृतिक विवाहसोहळ्यातून एकता आणि माणुसकीचा प्रचार करण्यास मदत करा”, अशा शब्दांत चेतनने चाहत्यांना विनंती केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 5, 2020 2:30 pm

Web Title: kannada actor hand out copies of the constitution at their wedding ssv 92
Next Stories
1 प्रकाश राज यांचा भाजपाला सणसणीत टोला, म्हणाले…
2 फक्त 10 मिनिटांसाठी ‘तो’ ड्रेस घालून दाखवा; ट्रोल करणाऱ्यांना हिना खानचं खुलं आव्हान
3 सावित्री जोती : जोतीराव -सावित्रीबाईंचा असा रंगला विवाहसोहळा
Just Now!
X