News Flash

प्रसिद्ध अभिनेत्रीचा कार अपघात; रुग्णालयात उपचार सुरु

आसपास जमलेल्या लोकांनी पोहोचवलं रुग्णालयात

दाक्षिणात्य अभिनेत्री रोहिणी सिंहचा कार अपघात झाला आहे. या कारमध्ये तिच्यासोबत अभिनेता जय जगदिश यांची मुलगी अर्पिता देखील होती. दोघंही या अपघातात जबरदस्त जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

अवश्य पाहा – “मराठी प्रेक्षकांनाच मराठी चित्रपट पाहायचे नाहीत”; महेश मांजरेकर संतापले

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार रोहीणी आणि अर्पिता एका बर्थडे पार्टीवरुन आपल्या घरी परतत होते. त्यावेळी बंगळुरमधील मावल्लीपुरा येथे त्यांच्या कारचं नियंत्रण सुटलं आणि त्यांचा अपघात झाला. त्यानंतर जखमी अवस्थेतील या तरुणींना तेथे जमलेले लोकांनी दुसऱ्या एका गाडीच्या मदतीने रुग्णालयात उपचारासाठी नेले. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार दोघांचीही प्रकृती सध्या स्थिर आहे. मात्र दोघांचे हात पाय फ्रॅक्चर झाले आहेत. येत्या तीन आठवड्यात त्यांना रुग्णालयातून सुटी मिळण्याची शक्यता आहे.

अवश्य पाहा – Sushant Suicide Case: खरंच रिया चक्रवर्ती फरार आहे का? पाटणा पोलीस म्हणाले…

रोहिणी सिंह कन्नड सिनेसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने आतापर्यंत ‘बेंकि बिरुगली’, ‘कटारी विरा’ ‘सुरासुंदरागीनी’, ‘काला माल्ला सुल्ला’, ‘कंतीरावा’ या चार चित्रपटांमध्ये काम केले आहे. चित्रपटांमध्ये ती फारशी झळकलेली नसली तरी सोशल मीडियावर मात्र ती चांगलीच चर्चेत असते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 31, 2020 4:32 pm

Web Title: kannada actress rohini singh and cousin arpita injured in a car accident mppg 94
Next Stories
1 ‘सुशांतच्या घरातले केवळ पैशांकडे लक्ष देतायेत पण…’, कंगना संतापली
2 सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात देवेंद्र फडणवीसांनी केलं भाष्य; म्हणाले…
3 “दान नकोय आम्हाला काम हवय”; जेष्ठ अभिनेत्री महाराष्ट्र सरकारवर संतापल्या
Just Now!
X