News Flash

भावाच्या हत्येप्रकरणी अभिनेत्रीला अटक

जाणून घ्या काय आहे प्रकरण..

भावाची हत्या केल्या प्रकरणी कन्नड अभिनेत्री शनाया कटवेला हुबळी पोलिसांनी अटक केली आहे. भावाची हत्या केल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला आहे. देवरगुडीहल जंगलात शनायाचा भाऊ राकेश कटवेचा मृतदेह पोलिसांना आढळला आहे. राकेशची निर्घृण हत्या करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

‘न्यू इंडियन एक्सप्रेस’ने दिलेल्या वृत्तानुसार, पोलिसांना राकेशच्या शरीराचे काही अवयव हुबळी आणि गदग रोड येथील परिसरात सापडले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी अहमद काटीगार, तौसिफ छन्नापूर, अलताफ मुल्ला आणि अमन गिराणीवाले या चार जणांना अटक केली आहे. तसेच राकेशच्या हत्येच्या कटात त्याची बहीण अभिनेत्री शनाया कटवे देखील सहभागी होती, अशी माहिती समोर आली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shanaya (@its_shanayaofficial)

या प्रकरणाचा तपास करत असताना राकेशच्या हत्येमध्ये त्याची बहीण शनायाचा सहभाग असल्याचे पोलिसांच्या लक्षात आलं. शनायाचे नियाझ अहमद काटीगारवर प्रेम होते. मात्र शनायाचा भाऊ राकेशचा त्यांच्या नात्याला विरोध होता. त्यामुळे शनाया आणि नियाझने मिळून राकेशच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

९ एप्रिल रोजी हत्येची ही घटना घडली. त्यावेळी शनाया तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हुबळी येथे गेली होती. तिने नियाझ आणि इतर काही मित्रांच्या मदतीने राकेशची निर्घृण हत्या केली. त्याच्या मृतदेहाचे तुकडे करुन शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी फेकून देण्यात आले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 27, 2021 5:53 pm

Web Title: kannada actress shanaya katwe held for brother murder avb 95
Next Stories
1 मालदीवला गेलेले लव्ह बर्ड्स मुंबईत परतले; नेटकऱ्यांनी विचारलं कशी होती ट्रीप ?
2 करोनाच्या संकटात आयुष्यमान खुराना आणि ताहिराची महाराष्ट्राला मदत; “ही वेळ एकत्र येण्याची”
3 ‘म्हणून सैफ आणि करीनाच्या लग्नासाठी उत्सुक नव्हते’, शर्मिला टागोर यांनी केला खुलासा
Just Now!
X