News Flash

बिग बॉसमधील अभिनेत्रीचा लग्नानंतर आत्महत्येचा प्रयत्न; ‘या’ कारणामुळे उचललं टोकाचं पाऊल

"त्याच्या कुटुंबियांनी मला.."

(photo-instagram@chaithrakotoor_official)

बिग बॉस कन्नडची स्पर्धक असलेल्या अभिनेत्री चैत्रा कोट्टूर हिने तिच्या राहत्या घरात आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लग्नानंतर ओढावलेल्या वादातून चैत्राने हे पाऊल उचलंल आहे. 8 एप्रिलला चैत्राने फिनाइल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या चैत्राची प्रकृती स्थिर असल्याचं IANS च्या वृत्तात सांगण्यात आलं आहे.

काही दिवसांपूर्वीच चैत्राने उद्योजक असलेल्या नागार्जुनशी लग्न केलं असल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे. नागार्जुनच्या कुटुंबियांनी दोघांच्या नात्याचा स्विकार न केल्यानं त्यांच्या लग्नात अडथळा निर्माण झाला होता. तर पोलिसांच्या माहितीनुसार नागार्जुननेदेखील काही लोकांच्या दबावामुळे हे लग्न केल्याचं म्हंटलं होतं. लग्नाची इच्छा नसतानाही केवळ काही लोकांच्या दबावामुळे त्याला हे लग्न करावं लागल्याचं त्याने म्हंटलं आहे.

गेल्या महिन्यातच चैत्रा आणि नागार्जुनच्या मंदिरातील लग्नाचे फोटो व्हायरल झाले होते. गेल्या काही वर्षांपासून चैत्रा नागार्जुनसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. चैत्राने तिच्या कुटुंबियांच्या उपस्थितीत एका मंदिरात नागार्जुनसोबत लग्नगाठ बांधली. मात्र नागार्जुनच्या कुटुंबियांनी चैत्रावर गंभीर आरोप केले आहेत. नागार्जुनला धमकावून हे लग्न केल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला आहे.

त्यानंतर हे प्रकरण कोलारमधील पोलिस ठाण्यात पोहचलं. त्यानंतर दोघांच्या कुटुंबियांना पोलिस ठाण्यात बोलावून घेण्यात आलं होतं. असं स्थानिक वृत्त संस्थांकडून सांगण्यात आलंय. तसचं नागार्जुनच्या कुटुंबियांनी या लग्नाला मान्यता न दिल्यानं चैत्राला त्याच्या घरातही प्रवेश नाकारण्यात आल्याचं तिने रिपोर्टमध्ये म्हंटलं आहे.

“त्याच्या कुटुंबियांनी मला आणि माझ्या कामाबद्ल वाईट शब्द वापरले. एवढचं नाही तर मी त्याला सोडलं नाही तर मला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे मी पोलिस ठाण्यातच जे काही त्यावर चर्चा करण्याची विनंती केली.” असं चैत्रा म्हणाल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

चैत्रा कोट्टरू हिने बिग बॉस कन्नडाच्या 7 व्या पर्वात भाग घेतला होता. बिग बॉसमध्ये सहभागी होण्यापूर्वी तिने काही मालिकांसाठी कथा लेखन केलं आहे. सुजीदारा या सिनेमातही तिने अभिनय केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2021 10:32 am

Web Title: kannada ex bigg boss contestant chaitra kotturu suicide attempt after marriage issue kpw 89
Next Stories
1 अल्लू अर्जुन- रश्मिकाच्या ‘पुष्पा’चा सोशल मीडियावर धुमाकुळ, चाहत्यांकडून मोठी पसंती
2 “२५ वर्षांपुढील सर्वांना लस उपलब्ध करावी”, सोनू सूदची सरकारकडे मागणी
3 चित्रपट परिनिरीक्षण अपिलीय लवाद बरखास्त
Just Now!
X