24 November 2020

News Flash

थाटात पार पडलं चिरंजीवी सरजाच्या पत्नीचं डोहाळ जेवण; दिराने दिलेल्या गिफ्टची सोशल मीडियावर चर्चा

ध्रुवा सरजाने दिलं खास गिफ्ट

दाक्षिणात्य दिवगंत अभिनेता चिरंजीवी सरजा याचं निधन होऊन आता बराच काळ लोटला आहे. चिरंजीवचं निधन झालं त्यावेळी त्याची पत्नी तीन महिन्यांची गर्भवती होती. त्यामुळे लवकरच त्यांच्या घरी नव्या सदस्याचं आगमन होणार आहे. नुकतंच चिरंजीवीची पत्नी मेघना राज हिच्या डोहाळ जेवणाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात चिरंजीवीचा धाकटा भाऊ ध्रुव सरजा याने नव्या बाळाच्या आगमनापूर्वीची त्याच्यासाठी खास गिफ्ट आणलं आहे. ध्रुवा सरजाने तब्बल १० लाखांचा पाळणा आणल्याचं पाहायला मिळालं.

सध्या ध्रुवा सरजा याच्या घरी एकीकडे चिरंजीवी सरजा याच्या निधनाचं दु:ख आहे, तर दुसरीकडे घरात नवा सदस्य येणार म्हणून उत्साह आहे. चीरंजीवच्या बाळाचं आगमन होणार असल्यामुळे त्याच्या घरातले सारं दु:ख पचवून या नव्या पाहुण्याच्या स्वागतासाठी सज्ज आहेत. त्यामुळेच मेघनाच्या डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमात ध्रुवा सरजाने बाळासाठी खास १० लाखांचा चांदीचा पाळणा खरेदी केला.

 

View this post on Instagram

 

Some are called friends… but they are called MC’s Forever LIFELINES! My CONSTANTS! blessed to have u guys in our life!

A post shared by Meghana Raj Sarja (@megsraj) on

सध्या सोशल मीडियावर ध्रुवा सरजाचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये तो चांदीच्या पाळण्याजवळ उभा असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे भावाच्या निधनानंतर ध्रुवाने संपूर्ण कुटुंबाची आणि येणाऱ्या नव्या पाहुण्याची जबाबदारी घेतल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

दरम्यान, ७ जून रोजी हृदयविकाराच्या झटक्याने चिरंजीवीचं निधन झालं. बंगळुरुमधील रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु होते.मात्र उपचारादरम्यान त्याचं निधन झालं. त्याच्या निधनामुळे ध्रुवला प्रचंड धक्का बसला असून त्याने इन्स्टाग्रामवर एक भावूक पोस्टही शेअर केली होती. चिरंजीवीच्या निधनानंतर पाच दिवसांनी ध्रुव याने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये पोस्ट शेअर केली असून लिहिलं आहे की, “मला तू पुन्हा हवा आहेस…तुझ्याशिवाय शक्य नाही”, असं म्हटलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 21, 2020 10:25 am

Web Title: kannada star dhruv sarja bought silver crib worth rs ten lakh for his brother baby ssj 93
Next Stories
1 प्रिती झिंटाने १०-१५ वेळा नाही, तर तब्बल इतक्या वेळा केली करोना चाचणी
2 यश चोप्रा यांचं ‘या’अभिनेत्रीवर होतं जीवापाड प्रेम; पण ‘या’ कारणामुळे नाही झालं लग्न
3 ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ची २५ वर्षे पूर्ण
Just Now!
X