27 November 2020

News Flash

कपिलच्या घरी होणार नव्या पाहुण्याचं आगमन?

सोशल मीडियावर चर्चेला उधाण

कॉमेडी किंग कपिल शर्मा हे नाव चाहत्यांसाठी नवीन नाही. द कपिल शर्मा शो या कार्यक्रमाच्या माध्यमातून तो घराघरात पोहोचला आहे. त्यामुळे कायमच तो सोशल मीडियावर चर्चेत असतो. विशेष म्हणजे सध्या कपिलसोबतच त्याच्या पत्नीची म्हणजे गिन्नीची चर्चा रंगली आहे. गिन्नी गरोदर असून कपिल पुन्हा बाबा होणार असल्याचं सध्या चर्चा सुरु आहे.

सध्या सोशल मीडियावर गिन्नीचा एक फोटो व्हायरल होत असून यात ती प्रेग्नंट दिसत असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. इतकंच नाही तर जानेवारी महिन्यात कपिलच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. अद्याप या चर्चांवर कपिल किंवा त्याच्या पत्नीने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

दरम्यान, कपिल आणि गिन्नी यांचं १२ डिसेंबर २०१८ रोजी लग्न झालं असून त्यांना अनायरा नावाची एक लहान मुलगी आहे. अनायराचा जन्म १० डिसेंबर २०१९ रोजी झाला आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 21, 2020 1:16 pm

Web Title: kapil sharma and wife ginni expecting second child dcp98
Next Stories
1 तैमुर देखील अभिनेता होणार का?; जॅकलिनच्या प्रश्नावर सैफ अली खान म्हणाला…
2 टेलिव्हिजनवरील पहिला ऑनलाईन लग्नसोहळा रंगणार ‘शुभमंगल ऑनलाईन’ मालिकेमध्ये
3 ‘जयपूर पिंक पँथर’वर येतेय वेब सीरिज; अभिषेकने शेअर केलेला ट्रेलर तुम्ही पाहिलात का?
Just Now!
X