अनुपम खेर हे बॉलिवूडमधील एक नामांकित अभिनेते म्हणून ओळखले जातात. गेली तीन दशक ते सातत्याने प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. परंतु अनुपम खेर अभिनयासोबतच लेखक म्हणूनही तितकेच प्रसिद्ध आहेत. अलिकडेच त्यांचं ‘अनुपम खेर – युअर बेस्ट डे इज टुडे’ हे पुस्तक प्रकाशित झालं. या पुस्तकाची एक कॉपी त्यांनी प्रसिद्ध विनोदवीर कपिल शर्माला भेट स्वरुपात दिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kapil Sharma (@kapilsharma)

आपल्या पुस्तकाचं प्रमोशन करण्याच्या निमित्तानं अनुमप खेर यांनी द कपिल शर्मा शोमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी हे पुस्तक कपिलला भेट स्वरुपात दिलं. “या पुस्तकासाठी धन्यवाद अनुपम सर. तुम्ही या पुस्तकावर माझी आई, पत्नी आणि मुलीचं नाव लिहिलं आहे. ते फार छान दिसतंय. ही नावं वाचून माझे कुटुंबीय खूप आनंदी झाले आहेत. अनायरा देखील मोठी झाल्यावर खूप आनंदी होईल.” अशा आशयाची पोस्ट लिहून कपिलनं या अनोख्या भेटीसाठी अनुपम खेर यांचे आभार मानले आहेत.