भारतातील सर्वात लोकप्रिय विनोदवीर आणि अभिनेता कपिल शर्माने सोशल मीडियाद्वारे कायस्थ समाजाची माफी मागितली आहे. ‘कपिल शर्मा शो’च्या एका भागामध्ये कायस्थ समाजाच्या भावना दुखावल्या गेल्यामुळे कपिलने सोशल मीडिया पोस्टद्वारे माफी मागितली आहे.

२८ मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या भागामध्ये हे घडले होते. ‘प्रिय कायस्थ समाज, २८ मार्च २०२०ला प्रदर्शित झालेल्या द कपिल शर्मा शोच्या एपिसोडमध्ये श्री चित्रगुप्त यांचा उल्लेख करण्यात आला होता. या उल्लेखाने तुमच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी आणि माझी संपूर्ण टीम तुमची माफी मागतो’ असे कपिलने ट्विटमध्ये म्हटले आहे.

‘कोणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा कोणताही हेतू नव्हता. तुम्ही सर्वजण आनंदी, सुरक्षित आणि कायम हसत रहण्यासाठी मी देवाकडे प्रार्थना करतो’ असे पुढे म्हणत कपिल माफी मागितली आहे.

आणखी वाचा : कपिल शर्माच्या सर्वात महागड्या ५ गोष्टी

सध्या लॉकडाउनमध्ये कपिल शर्मा आपल्या कुटुंबीयांसोबत वेळ घालवताना दिसत आहे. तसेच सोशल मीडियावर तो जुने फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी त्याचा आणि चंदन प्रभाकरचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ अर्चाना पूरन सिंहने शेअर केला होता.