14 November 2019

News Flash

अखेर कपिल शर्माच्या मदतीला धावला सोहेल खान

सोहेलने एका शोदरम्यान कपिलला त्याच्या आगामी 'शेर खान' सिनेमात घेण्याचे वचन दिले होते

सलमान खानचा छोटा भाऊ सोहेल खान लवकरच शेर खान या त्याच्या आगामी सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरूवात करणार आहे. स्वतः सलमानने याबद्दल खुलासा केला आहे. या सिनेमात सलमान, सोहेलसोबत मनोरंजनाचा तडका लावायला दस्तुरखुद्द कपिल शर्माही या टीममध्ये असणार आहे.

सोहेलने एका शोदरम्यान कपिलला त्याच्या आगामी ‘शेर खान’ सिनेमात घेण्याचे वचन दिले होते. दिलेल्या वचनाला जागत सोहेलने त्याला सिनेमात घेतले. अनेक महिन्यांपासून या सिनेमाबद्दल काही बोललेच गेले नव्हते, त्यामुळे सोहेलने हा सिनेमा बनवण्याचा विचार सोडला असावा असे म्हटले जात होते. मात्र आता या सिनेमाच्या प्राथमिक बांधनीला सुरूवात झाली आहे. सध्या सलमान ‘रेस- ३’ सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. एका पत्रकार परिषदेत ‘रेस- ३’ बद्दल बोलत असताना सलमानने त्याच्या आगामी ‘दबंग- ३,’ ‘किक- २’ आणि रेमो डिसुझा दिग्दर्शित शेर खान या डान्सवर आधारित सिनेमांची माहिती दिली.

दरम्यान, बॉलिवूड अभिनेता सलमान खानला काही दिवसांपूवी काळवीट शिकार प्रकरणाची जोधपूर न्यायालयात सुनावणी होत असताना, लॉरेन्स बिश्नोई या नावाने उघडपणे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. तेव्हा लॉरेन्सच्या धमकीकडे लोकांनी फारसे लक्ष दिले नाही. पण ६ मे रोजी लॉरेन्सचा सहकारी संपत नेहराला हरियाणा पोलिसांनी अटक केली आणि त्याच्याकडून लॉरेन्सचा खुनाचा कट कळला. यामुळेच सलमानच्या सुरक्षेत आता वाढ करण्यात आली आहे.

First Published on June 14, 2018 3:48 pm

Web Title: kapil sharma come back with salman khan next film sher khan