गेल्या काही दिवसांपासून कॉमेडियन कपिल शर्माची तब्येत फारशी चांगली नसते. अचानक स्वास्थ्य बिघडल्यामुळे त्याचे ‘द कपिल शर्मा शो’चे अनेक एपिसोड रद्द करावे लागले. मीडिया रिपोर्टनुसार, कपिल सध्या तणावाखाली आहे. कपिलच्या टीमने अनेक दिवस ही गोष्ट कोणाला सांगितली नव्हती. पण आता त्याने यावर मोकळेपणाने बोलण्याचे त्यांनी ठरवले आहे. एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत कपिल म्हणाला की, सध्या माझी तब्येत बरी नाहीये हे मला मान्य आहे पण मला कोणतेही नैराश्य आलेले नाही.

VIDEO: सर्व सामान्य पती- पत्नीसारखेच भांडतात ऐश्वर्या आणि अभिषेक

या मुलाखतीत कपिल म्हणाला की, ‘माझा शो, सिनेमाचं शूटिंग, अॅवॉर्ड्स शो आणि इतरच्या कार्यक्रमांमुळे स्वतःकडे लक्ष द्यायला फारसा वेळ मिळत नाही. याचा परिणाम शेवटी शरीरावर होऊन रक्तदाब कमी झाला आणि रुग्णालयात दाखल करावे लागले. अचानक कार्यक्रम रद्द करण्यात आल्यामुळे अनेक कलाकारांना एपिसोडचे चित्रीकरण न करताच परतावे लागले होते. याबद्दल बोलताना कपिल म्हणाला की, ‘असं काहीच झालं नाही. या सगळ्या अफवा आहेत. मी कोणालाही ताटकळत ठेवलं नाही.’ तसंच यावेळी त्याने आपल्या चाहत्यांचे आणि मित्र- परिवाराचे आभार मानले.

‘पतीने दिलेल्या पोटगीवर मजा मार’ कमेन्टवर मलायकाने दिले सडेतड उत्तर

दरम्यान, कपिलची ऑनस्क्रीन पत्नी म्हणजेच अभिनेत्री सुमोना चक्रवर्तीने कपिलच्या आरोग्याविषयी वक्तव्य केले होते. तिने एका मुलाखतीत कपिलची तब्येत ठीक नसल्याचे म्हटले होते. ‘आमचा शो त्याच्या नावावरच असल्याने तो जास्त तणावाखाली आहे. आपल्या सर्वांच्याच जीवनात स्वास्थ्याशी निगडीत समस्या येत असतात. मात्र कधी कधी आजारी पडणं खूप महागात पडतं,’ असं सुमोना म्हणाली होती.