21 September 2018

News Flash

कपिलच्या या व्हॅनिटी व्हॅनसमोर फाइव्ह स्टार हॉटेलही पडेल फिके

कपिलच्या या व्हॅनचे इंटिरियर दिलीप छाबडिया यांनी केले

कपिल शर्मा

विनोदवीर कपिल शर्मा पुन्हा एकदा नव्या जोशात छोट्या पडद्यावर पुनरागमन करायला सज्ज झाला आहे. पण सध्या कपिलच्या नवीन शोची चर्चा नसून त्याच्या व्हॅनिटी व्हॅनची चर्चा सुरू आहे. कपिलने सोशल मीडिया अकाऊंटवर त्याच्या व्हॅनिटी व्हॅनचा फोटो शेअर केला. या फोटोला कॅप्शन देताना त्याने लिहिले की, ‘डीसी या आलिशान व्हॅनसाठी धन्यवाद. नवीन शो… नवीन व्हॅनिटी व्हॅन’ यावेळी कपिलने व्हॅनचे काही फोटो शेअर केले. त्याची ही नवीन व्हॅन कोणत्याही फाइव्ह स्टार हॉटेलपेक्षाही आलिशान आहे. त्याच्या याच व्हॅनमुळे तो सोशल मीडियावर पुन्हा एकदा ट्रोल झाला आहे. ट्विटरकरांनी या फोटोंवर कमेंट करत त्याची टेर उडवली.

HOT DEALS
  • Apple iPhone 6 32 GB Gold
    ₹ 25900 MRP ₹ 29500 -12%
    ₹4000 Cashback
  • Moto Z2 Play 64 GB Lunar Grey
    ₹ 14999 MRP ₹ 29499 -49%
    ₹2300 Cashback

कपिलच्या या फोटोवर एका युझरने लिहिले की, ‘कपिल व्हॅनमध्ये बार आहे ना. दारुशिवाय तुझा शो कसा होईल… आणि लोकांना मारण्यासाठी चप्पलही ठेव.’ तर दुसऱ्या युझरने लिहिले की, ‘नवीन व्हॅनिटी तर मिळाली पण शोचा टीआरपी कसा उंचावणार. मला आजही तुझ्यात अतीआत्मविश्वास आहे. या शोमध्ये तू कोणाला मारणार? तू एक स्वार्थी माणूस आहेस, ज्याच्यासाठी इतर सगळेच शुन्य आहेत.’ अजून एका यूझरने लिहिले की, ‘कपिल या व्हॅनमधून तू उतरणार कसा याचा दरवाजा फार लहान आहे.’

First Published on March 5, 2018 5:54 pm

Web Title: kapil sharma get trolled for posting pictures his new vanity car