24 January 2019

News Flash

आणि तो परत येतोय…

प्रोमोमध्ये त्याच्यावरुन नजर हटत नाही

कपिल शर्मा

कॉमेडीचा बादशहा कपिल शर्मा गेल्या काही दिवसांपासून छोट्या पडद्यापासून तसेच मोठ्या पडद्यापासून लांब राहिला आहे. पण तो कितीही दूर गेला तरी त्याचे चाहते त्याला विसरले नाहीत. चाहत्यांच्या याच प्रेमाखातर कपिल पुन्हा छोट्या पडद्यावर परतायला सज्ज झाला आहे. त्याच्या नवीन शोचो प्रोमो नुकताच प्रदर्शित करण्यात आला. प्रोमोमध्ये कपिल त्याच जुन्या अंदाजात कॉमेडी करताना दिसत आहे. प्रोमोत एक रिक्षावाला कपिलला सोनी चॅनलच्या ऑफिसमध्ये घेऊन जाण्यास मनाई करतो. त्याचा नकार ऐकून कपिल त्याला ‘बाबा जी का ठुल्लू’ दाखवतो.
कपिल तिसऱ्यांदा त्याचा शो घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पण आधीच्या दोन शोपेक्षा हा शो थोडा वेगळा असेल असे म्हटले जात आहे. पहिल्यांदाच कपिलच्या नव्या शोच्या प्रोमोमध्ये त्याचे इतर सहकारी दिसले नाही. प्रोमोत तो एकटाच दिसला. त्यामुळे या नवीन शोमध्ये त्याचे जुने सह-कलाकार असणार की नाही हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

विनोदवीर कपिल शर्मासाठी २०१७ हे वर्ष फारसं चांगलं राहिलं नाही. अगदी नैराश्यात असण्यापासून कार्यक्रम बंद होण्यापर्यंतच्या बऱ्याच प्रसंगांनी कपिलच्या वाटेत अडचणी निर्माण केल्या. त्यातच भर पडली ती म्हणजे विनोदवीर सुनील ग्रोवरसोबतच्या त्याच्या वादाची.
सहकलाकार सुनील ग्रोवरशी झालेलं भांडण, कपिलचं सेटवर उशिरा पोहोचणं, कलाकारांना ताटकळत ठेवणं या सर्व गोष्टींनंतर कपिलचं व्यावसायिक आणि खासगी आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं. काही महिन्यांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला की, ‘आपल्यासंदर्भात होत असलेल्या चर्चा, काही गोष्टींना उगाच दिलेलं महत्त्व यांमुळे मला मानसिक त्रास होऊ लागला. त्यातूनच नैराश्य येऊन सतत दारू पिऊ लागलो. हे सर्व असह्य झाल्यानंतर एक असाही प्रसंग आला की मला आत्महत्या करावीशी वाटली. जेव्हा माझ्या शोचा टीआरपी घसरू लागला, तेव्हा परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली,’ असं तो म्हणाला.

‘माझ्या एका जिवलग मित्राने काही दिवसांसाठी मला त्याच्या समुद्रासमोरील घरी राहण्याचा सल्ला दिलेला. चांगले दृश्य पाहून माझ्यात सकारात्मकता येईल असं त्याला वाटलं. त्याच्या घरातील बाल्कनीतून मी जेव्हा समुद्राकडे पाहायचो, तेव्हा मला त्यात उडी मारून आत्महत्या करावीशी वाटत असे. संपूर्ण जग माझ्याविरोधात आहे, असंच मला जाणवू लागलं होतं.’

First Published on February 9, 2018 9:09 pm

Web Title: kapil sharma is back on tv and this new promo is very funny