News Flash

कपिल शर्माची नवी ‘कॉमेडी स्टाइल’

‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’ या कार्यक्रमात ‘गुत्थी’चे पात्र साकारणाऱ्या सुनील ग्रोव्हरने एक ट्वीट केले आहे

Kapil Sharma : कोण कुठल्या गोष्टीवरून दुखावलं जाईल सांगता येत नाही. इतकचं काय, एखाद्या विनोदामुळे तुरूंगातही जावे लागते, असे कपिलने 'आयएएनएस' वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

कपिल शर्मा याच्या ‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’ या कार्यक्रमावरून वाद आणि चर्चा झाली असली तरी हा कार्यक्रम लोकप्रिय ठरला होता. कार्यक्रमामुळे कपिल शर्मा घराघरांत पोहोचला. आता हा कार्यक्रम बंद झाला असला तरी लवकरच कपिल शर्मा ‘कॉमेडी स्टाइल’ हा नवा कार्यक्रम घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. कपिल व त्याच्या चमूचा हा कार्यक्रम ‘सोनी’ वाहिनीवरून प्रसारित होणार असल्याची चर्चा आहे.

‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’ या कार्यक्रमात ‘गुत्थी’चे पात्र साकारणाऱ्या सुनील ग्रोव्हर याने एक ट्वीट केले आहे. मला लवकरच मेक-अप करायचा असून आम्हाला सर्वाना भेटायचे आहे. पावसाळ्यापूर्वी आपण नक्की भेटू’ असे सुनीलने आपल्या ‘ट्वीट’मध्ये म्हटले आहे. सुनील ग्रोव्हरच्या या ट्वीटमुळे दूरचित्रवाहिन्या माध्यमात कपिल शर्मा याच्या नव्या शोची चर्चा सुरू झाली आहे. या कार्यक्रमाचे नाव ‘कॉमेडी स्टाइल’ असे ठेवण्यात आले असल्याचे समजते.

दरम्यान, आम्ही ‘स्टार’ आणि ‘सोनी’ या दोन्ही वाहिन्यांच्या संपर्कात आहोत. यापैकी आम्हाला योग्य वाटेल त्या वाहिनीवर आम्ही आमचा हा नवीन नवीन कॉमेडी कार्यक्रम घेऊन येऊ. अर्थात याबद्दल मार्च महिन्याच्या दुसऱ्या पंधरवडय़ात काही सांगता येईल, असे कपिल शर्मा याच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले. कपिल शर्मा याचा हा नवा कार्यक्रम कधी येणार असेल तेव्हा येईल, पण त्याची चर्चा मात्र आत्तापासूनच सुरू झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 7, 2016 3:05 am

Web Title: kapil sharma new comedy style
टॅग : Kapil Sharma
Next Stories
1 उदयोन्मुख गायकांसाठी ‘संगीत आणि त्यापलीकडे’चे व्यासपीठ
2 ओळखल का या बॅालिवूड अभिनेत्याला
3 कतरिनाने आदित्यसोबत दिला ३ मिनिटांचा किसींग सीन
Just Now!
X