25 April 2019

News Flash

कपिल शर्माच्या ‘सन ऑफ मनजीत सिंग’चं पोस्टर प्रदर्शित

काही दिवसापूर्वी कपिलनं ट्विट करत या चित्रपटाविषयीची माहिती दिली होती.

सन ऑफ मनजीत सिंग

कॉमेडीचा बादशाह या नावाने छोट्या पडद्यावर लोकप्रिय ठरलेल्या कपिल शर्माची पावली आता चित्रपटसृष्टीकडे वळाल्याचं पाहायला मिळात आहं. छोट्या पडद्यावरील प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर कपिलने पहिल्यांदाच निर्माते पदाची धुरा सांभाळली आहे. कपिलची पहिली निर्मिती असलेला ‘सन ऑफ मनजीत सिंग’ या चित्रपटाचं पोस्टर नुकतंच प्रदर्शित झालं आहे.

काही दिवसापूर्वी कपिलनं ट्विट करत या चित्रपटाविषयीची माहिती दिली होती. ‘सन ऑफ मनजीत सिंग’ या पंजाबी चित्रपटाचा कपिल निर्माता आहे. ऑक्टोबर महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा पोस्टर नुकताच प्रदर्शित झाला असून कपिलने हा पोस्टर सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यानंतर पहिल्यांदाच या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित झालं आहे.

‘सन ऑफ मनजीत सिंग’ या चित्रपटामध्ये पंजाबी अभिनेता गुरप्रीत गुगी याची प्रमुख भूमिका असल्याचं पाहायला मिळत आहे. तर या चित्रपटाचं दिग्दर्शन विक्रम ग्रोवर यांनी केलं असून हा चित्रपट १२ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

दरम्यान, कॉमेडी शो, नंतर चित्रपट अशा दोन्ही ठिकाणी आपलं नशिब आजमवल्यानंतर कपिल आता निर्मितीकडे वळला आहे. त्यामुळे कपिलच्या चाहत्यांना या चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता असल्याचं पाहायला मिळत आहे.

First Published on September 11, 2018 12:17 pm

Web Title: kapil sharma punjabi film son of manjeet singh first look