‘द कपिल शर्मा शो’ छोट्या पडद्यावर इतका हिट ठरला आहे की मोठमोठे सेलिब्रिटी त्यांच्या चित्रपटांच्या प्रमोशनसाठी एकदा तरी त्याच्या कार्यक्रमात नक्कीच पोहोचतात. असाच एक सेलिब्रिटी कपिलच्या शोमध्ये नुकताच येऊन गेला. हा सेलिब्रिटी आहे अभिनेता अजय देवगण. ‘तान्हाजी: द अनसंग वॉरिअर’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अजयने पत्नी काजोलसह कपिलच्या शोमध्ये हजेरी लावली. पण चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी कपिलने अजयकडून पैसे घेतल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हा व्हिडीओ कपिलने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. या व्हिडीओच्या सुरुवातीला कपिल हा अजयच्या चित्रपटाबद्दल बोलताना पाहायला मिळत आहे. त्यानंतर मध्येच अजय देवगण येतो आणि त्याच्या खिशातून काही पैसे काढून कपिलच्या हातात ठेवतो. अजयने कमी रक्कम दिली म्हणून कपिल विचारताच तो तिथून निघून जातो. ‘भ्रष्टाचार सगळीकडे आहे’ असं कॅप्शन देत कपिलने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. अर्थात हा सगळा कपिलच्या मस्करीच्या भाग आहे. त्यामुळे व्हिडीओच्या कमेंटमध्ये नेटकऱ्यांनी खळखळून हसण्याचे इमोजी पोस्ट केले आहेत.

आणखी वाचा : बॅकग्राऊंड डान्सर्स जे आता आहेत प्रसिद्ध बॉलिवूड सेलिब्रिटी

ओम राऊत दिग्दर्शित या चित्रपटात शिवकालीन इतिहासाच्या पानांमधील तानाजी मालुसरे या मावळ्याच्या पराक्रमाची कथा सांगण्यात येणार आहे. यामध्ये अजय देवगण, सैफ अली खान, काजोल यांसोबतच बरेच कलाकार भूमिका साकारत आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kapil sharma receives money from ajay devgn for promoting tanhaji watch hilarious video ssv
First published on: 15-12-2019 at 17:59 IST