कॉमेडीचा बादशहा कपिल शर्मा याच्यासाठी २०१८ हे वर्ष अनेक चढ- उताराचं ठरलं. या वर्षाच्या सुरूवातीपासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या कपिलच्या आयुष्यात एकामागोमाग एक विघ्नं आली. अखेर चंदेरी दुनियेकडे पाठ फिरवत कपिल सगळ्यांपासून दूर गेला. पण, कपिलच्या आयुष्यातील संकटांचं शुक्लकाष्ट आता संपलं असून तो लवकरच प्रेयसी गिन्नीच्या सोबतीनं नव्या आयुष्याला सुरूवात करणार आहे.
कपिलनं आपली लग्न पत्रिका ट्विटरवर शेअर करत चाहत्यांकडे भावी आयुष्यासाठी आशीर्वाद मागितले आहे. १२ तारखेला कपिल गिन्नीसोबत विवाहबंधनात अडकणार असून जालंधरमध्ये हा सोहळा संपन्न होणार आहे. १० तारखेला कपिलच्या बहीणीच्या घरी जागरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून ११ डिसेंबर रोजी जालंधरमध्ये गिन्नीच्या घरी संगीत आणि मेहंदीचा सोहळा रंगणार आहे. त्यानंतर १२ डिसेंबरला ही जोडी लग्नगाठ बांधणार आहे. १४ डिसेंबर रोजी अमृतसरमध्ये एका रिसेप्शन पार्टीचं आयोजन करण्यात आलं आहे.
Need ur blessings pic.twitter.com/3jYYjlw8g7
— KAPIL (@KapilSharmaK9) November 27, 2018
दरम्यान, कलाविश्वातील मित्रमंडळींसाठी कपिलने मुंबईमध्ये देखील एक पार्टी आयोजित केली असून २४ डिसेंबरला ही पार्टी होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे लग्नानंतर लगेच कपिलाचा आगामी ‘द कपिल शर्मा शो’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सोनीनं नुकतीच याची घोषणा केली असून अधिकृत ट्विटर अकाऊंटवर याचा पहिला टीझरही प्रदर्शित करण्यात आलाय. सूत्रांच्या माहितीनुसार, हा शो २५ डिसेंबरला ऑन एअर येण्याची शक्यता आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 27, 2018 5:43 pm