01 March 2021

News Flash

बाप-लेकीची जोडी! कपिल शर्माच्या मुलीला पाहिलेत का?

सगळ्यांना गुडमॉर्निंग म्हणत शेअर केला फोटो

कॉमेडीयन, अभिनेता कपिल शर्मा नेहमीच आपल्या अनोख्या अंदाजामुळं छोट्या पडद्यावर तसंच सोशल मिडियावरही कायम चर्चेत असतो. आज त्यानं आपल्या मुलीसोबतचा एक गोड फोटो शेअर केला आहे. त्यावर नेटकऱ्यांकडून त्याचं खूप कौतुक होतंय.

आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून कपिल शर्माने त्याच्या मुलीसोबतचा फोटो शेअर केलाय. त्याची मुलगी अनायरा फिकट गुलाबी फ्रॉक आणि दोन वेण्या घालून त्याच्यासोबत उभी आहे. कपिलप्रमाणेच अनायराही कॅमेऱ्याकडे बघून हात करतेय. या फोटोला त्याने ‘गुड मॉर्निंग एव्हरीवन’ असं कॅप्शनही दिलंय. हा फोटो नेटकऱ्यांना चांगलाच आवडलाय. अवघ्या दोन तासातच या फोटोला १२ लाखाहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kapil Sharma (@kapilsharma)

कपिलच्या ‘द कपिल शर्मा शो’मधल्या सहकाऱ्यांनी या फोटोवर कमेंट्स केल्या आहेत. “मेरी बच्ची”असं भारती सिंग म्हणतेय तर शुमोना चक्रवर्तीने “अरे अरे क्युटनेस की दुकान” अशी कमेंट केली आहे. तर गायिका नेहा कक्कर, नीती मोहन आणि तिची बहीण मुक्ती मोहन यांनीही या बापलेकीचं कौतुक करणाऱ्या कमेंट्स केल्या आहेत. कपिलच्या चाहत्यांनाही हा फोटो खूपच आवडला आहे. अनेकांनी सकाळी सकाळी असा छान फोटो पोस्ट केल्याबद्दल त्याचे आभारही मानले आहेत.

काही दिवसांपूर्वीच कपिलच्या घरी अजून एका छोट्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. त्याने आणि त्याची बायको गिन्नीने सोशल मिडियावरून आपल्या चाहत्यांना याची माहिती दिली आहे. ‘द कपिल शर्मा शो’ या कार्यक्रमामुळे कपिल घराघरात पोहोचला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 19, 2021 4:09 pm

Web Title: kapil sharma shared a photo with his daughter vk98
Next Stories
1 शाहिद कपूरचे डिजिटल विश्वात पदार्पण
2 मलाही सुशांत बनवू इच्छितात; अभिनेत्याचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल
3 फास्टॅग नव्हे स्लोटॅग! कोल्हापूर-पुणे प्रवासात गीतकार संदीप खरेंना बसला फटका, प्रशासनाला केली ‘ही’ विनंती
Just Now!
X