News Flash

कपिलने फेसबुकवर शेअर केला होणाऱ्या बायकोचा फोटो

माझं हिच्यावर दीपिकापेक्षा जास्त प्रेम आहे

कपिल शर्मा आणि गिन्नी छत्राथ

कपिल शर्मा नेहमीच आपल्या शोमुळे आणि बॉलिवूड अभिनेत्रींसोबत करत असलेल्या फ्लर्टमुळे सतत चर्चेत असतो. मग ती अनुष्का शर्मा असो किंवा शिल्पा शेट्टी तो कोणत्याही अभिनेत्रीसोबत फ्लर्ट करायला मागे राहत नाही. द कपिल शर्मा शोमध्ये तर त्याने जॅकलिन फर्नांडिससोबत लग्नही केले होते. पण त्याचं प्रेम नेहमीच दीपिका पदुकोण होती हे त्याने मान्य केले आहे. कपिलने त्याच्या शोमध्ये अनेकदा दीपिकावरचे क्रश बोलून दाखवले आहे. पण आता त्याने त्याच्या आयुष्यातल्या त्या खास मुलीचा फोटो फेसबुकवर शेअर केला आहे. गिन्नी छत्राथ असे त्या मुलीचे नाव आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कपिलने गिन्नीसोबत साखरपुडा केला असून तो लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे.

कपिलने शनिवारी, १८ मार्चला गिन्नीसोबतचा एक फोटो शेअर केला. या फोटोला कॅप्शन देताना कपिलने लिहिले की, माझं हिच्यावर दीपिकापेक्षा जास्त प्रेम आहे. ऑनस्क्रीन कपिलने कितीही थट्टामस्करी केली तरी या फोटोवरुन हे सिद्ध होते की त्याच्या आयुष्यात त्या एका मुलीची एन्ट्री झाली आहे. दोघंही एकमेकांसोबत फार खूश आहेत.

कपिलने शेअर केलेला हा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच गाजतो आहे. त्याच्या या फेसबुक पोस्टला हजारोंमध्ये लाइक्स आले आहेत. कपिलचे चाहते किती आहेत हे तर त्याच्या फेसबुकवर असलेल्या फॉलोअर्सकडे पाहून आणि द कपिल शर्मा शोची असलेली लोकप्रियता पाहून कळतेच.

कपिलच्या शोमध्ये येणारे प्रेक्षक हे अनेकदा परदेशातून येतात. कपिलही त्याच्या चाहत्यांसोबत अगदी प्रेमाने बोलतो. कारण आज मी काही आहे ते चाहत्यांमुळेच आहे असे कपिललचे ठाम मत आहे. कलर्स वाहिनीवरचा त्याचा शो बंद झाल्यावर त्याला धक्का बसला होता. पण सोनी चॅनलवर नवीन शो घेऊन त्याने नव्याने सुरुवात केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 18, 2017 2:21 pm

Web Title: kapil sharma shared the picture of his wife on facebook
Next Stories
1 अनुष्का स्वतःला समजायची कचरा वेचणारी मुलगी
2 शाहिद, सोनाक्षीचा ड्रायव्हर आता विकतोय मोमोज्!
3 राजामौलीने करणला का दिली कटप्पाची तलवार?
Just Now!
X