छोट्या पडद्यावरचा सुपरस्टार आणि कॉमेडीचा बादशहा कपिल शर्मा नुकताच प्रेयसी गिन्नीसोबत विवाहबंधनात अडकला. मोजक्याच मित्रपरिवाराच्या उपस्थितीत जालंधरमध्ये हा विवाहसोहळा संपन्न झाला. त्यानंतर आठवड्याभरानं कपिलनं आपल्या विवाहसोहळ्यातील काही खास क्षण सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर लग्नाचा छोटासा व्हिडिओ शेअर करत त्यांनं चाहत्यांना खास भेटही दिली आहे. १२ डिसेंबरला कपिल गिन्नी छत्रतसोबत विवाहबंधनात अडकला होता. या सोहळ्यासाठी कपिल आणि गिन्नीचे कुटुंबीय आणि मनोरंजन विश्वातले मोजकेच लोक उपस्थित होते, विशेष म्हणजे कपिलनं १३ डिसेंबर रोजी स्वत:च्या युट्यूब चॅनेलवरून आपल्या लग्नाचा व्हिडिओ लाइव्ह केलाही केला होता.

काही दिवसांपूर्वी कपिलनं बॉलिवूडसाठी रिसेप्शन पार्टीचं आयोजनही केलं होतं या पार्टीत दीपिका, रणवीर, अनिल कपूरसारख्या अनेक कलाकार मंडळींनी उपस्थिती लावली होती.