News Flash

सुनील ग्रोवरच्या ‘सुपर नाइट विथ ट्युबलाइट’साठी कपिलच्या शोला डच्चू

सुनील, अली, सुगंधा आणि चंदनसोबतचे जुने दिवस कपिलला नक्कीच आठवत असतील.

सलमान, सुनीलच्या 'सुपर नाइट विथ ट्युबलाइट'ला वेळ देण्यासाठी 'द कपिल शर्मा शो'चा एक भाग कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कॉमेडियन कपिल शर्माचा शो Kapil Sharma show आता कुठे जरा डोकं वर काढत टीआरपीच्या शर्यतीत वर येत होता. कपिलच्या आयुष्यात काहीतरी चांगले घडते ना घडते तोवर आता सुपर नाइट विथ ट्युबलाइट हा खास शो आता येऊ घातला आहे. जेव्हा कपिल शर्मा Kapil Sharma आणि सलमान खान-सुनील  ग्रोवरमध्ये निवडण्याची वेळ येते तेव्हा त्याचे उत्तर काय असणार हे सर्वांनाच माहित आहे. सोनी वाहिनीवरदेखील ही निवड करण्याची वेळ आली आणि त्यांच्या समोर उत्तर अगदी स्पष्ट होते. सोनी वाहिनीने जराही विचार न करता सलमान salman khan आणि सुनीलला Sunil Grover सगळ्यात आधी प्राधान्य दिले. सलमान, सुनीलच्या ‘सुपर नाइट विथ ट्युबलाइट’ला Super Night With Tubelight वेळ देण्यासाठी ‘द कपिल शर्मा शो’चा एक भाग कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

वाचा : मराठी चित्रपटसृष्टीतील ‘कूल बाबा’

‘द कपिल शर्मा शो’मध्ये एक काळ गाजवणारे सुनील ग्रोवर, चंदन प्रभाकर, सुगंधा मिश्रा, अली असगर आणि संकेत भोसले हे दोन तासाचा एक खास कार्यक्रम करणार आहेत. हा कार्यक्रम सोनी एण्टरटेन्मेन्ट वाहिनीवर रविवारी दुपारी १२ वाजता आणि रात्री ९ वाजता दाखविण्यात येणार आहे. याचाच अर्थ या आठवड्यात केवळ शनिवारीच कपिलला प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याची आणि टीआरपीमध्ये टीकून राहण्याची संधी मिळणार आहे.

वाचा : मी सईला पहाटे ३ वाजताही उठवतो- सागर कारंडे’

वाहिनीकडून ट्विटर आणि फेसबुक या सोशल हॅण्डलवर सुनीलच्या खास कार्यक्रमाचे काही टीझर पोस्ट करण्यात आले आहेत. हे टीझर पाहता ‘सुपर नाइट विथ ट्युबलाइट’ एखाद्या ब्लॉकबस्ट चित्रपटापेक्षा कमी असणार नाही असेच दिसून येते. या खास कार्यक्रमात सुनील ग्रोवर पुन्हा एकदा डॉक्टर मशहूर गुलाटी आणि अमिताभ बच्चन यांच्या भूमिकेत दिसणार असून, अली असगर नर्सच्या तर सुगंधा मिश्रा विविध भूमिकांमधून सलमानच्या डोळ्यांतून पाणी येईपर्यंत त्याला हसायला भाग पाडताना दिसतील. केवळ हे कॉमेडियन्सच नाही तर सलमान आणि त्याचा भाऊ सोहेल खान हेसुद्धा त्यांच्या विनोदी पंचनी प्रेक्षकांना हसायला भाग पाडतील. याविषयी ‘इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना अली असगर म्हणाला की, सलमानपेक्षाही सोहेलचा विनोदाचा टायमिंग अप्रतिम आहे. तो विनोदांवर अतिशय उत्सफुर्तपणे एका ओळीत प्रतिसाद देतो.

हे सर्व दृश्य पाहता सुनील, अली, सुगंधा आणि चंदनसोबतचे जुने दिवस कपिलला नक्कीच आठवत असतील. सुनीलसोबतच्या विमान प्रवासातील वादानंतर टेलिव्हिजन विश्वातील कपिलची जादू आता काहीशी कमी होत असल्याचे चित्र आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2017 12:20 pm

Web Title: kapil sharma show dropped due to sunil grovers super night with tubelight with salman khan and sohail
Next Stories
1 हॉलिवूडमध्ये ‘द रॉक’ला मागे टाकत प्रियांका बनली नंबर एकची सेलिब्रिटी
2 Father’s Day 2017 : मराठी चित्रपटसृष्टीतील ‘कूल बाबा’
3 Father’s Day 2017: मी सईला पहाटे ३ वाजताही उठवतो- सागर कारंडे
Just Now!
X