28 February 2021

News Flash

व्हील चेअरवरुन जाण्याची वेळ का आली? कपिल शर्मानेच सांगितलं कारण

मास्क अन् काळे कपडे... कपिल शर्माच्या व्हील चेअरवरील त्या फोटो मागील सत्य काय?

सध्या सोशल मीडियावर कॉमेडियन कपिल शर्माचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये कपिल मुंबई विमानतळावर असल्याचे दिसत आहे. दरम्यान तो व्हील चेअरवर बसलेला दिसत आहे. तोंडाला मास्क,काळ्या रंगाचा गॉगल आणि काळ्या रंगाचे कपडे कपिलने परिधान केले होते. हा व्हिडीओ पाहून कपिलला नक्की काय झाले आहे? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. आता खुद्द कपिलने यावर वक्तव्य केले आहे.

विरल भय्यानी या सेलिब्रिटी फोटोग्राफरने सोशल मीडियावर कपिलचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये कपिलला व्हील चेअरवर पाहून फोटोग्राफरने तब्येती विषयी विचापरूस केली. पण ते ऐकून कपिल चिडला आणि तेथून निघून गेला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

स्पॉटबॉयला नुकतीच कपिल शर्माने मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याला सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओबाबत विचारण्यात आले होते. त्यावर त्याने ‘माझी तब्बेत ठिक आहे. जीममध्ये वर्कआऊट करताना पाठिला दुखापत झाली आहे. मी काही दिवसांमध्ये ठिक होईन’ असे उत्तर दिले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Voompla (@voompla)

काय आहे प्रकरण?

सोमवारी कपिल शर्मा एका व्हील चेअरवर बसून मुंबई विमानतळावरुन बाहेर पडला होता. दरम्यान फोटोग्राफरने त्याचे काही व्हिडीओ आणि फोटो काढले होते. एका फोटोग्राफरने त्याला ‘कपिल सर कसे आहात? आम्ही व्हिडीओ शूट करत आहोत’ असे म्हटले होते. त्यावर कपिलने ‘तुम्ही सर्वजण आधी बाजूला व्हा’ असे म्हटले. त्यानंतर थोडं पुढे जाऊन त्याने ‘उल्लू के पठ्ठे’ असे म्हटले होते. त्यावर फोटोग्राफर कपिलला म्हणतो तुम्ही जे काही बोलत आहात ते कॅमेरामध्ये रेकॉर्ड झाल्याचे सांगतो. ‘करा रेकॉर्ड… सर्वजण बेशिस्त आहात’ असे कपिल बोलताना दिसत होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 23, 2021 1:20 pm

Web Title: kapil sharma solves the wheelchair mystery avb 95
Next Stories
1 छोट्या पडद्यावरचा रोमॅण्टिक हिरो; अभिनय ते रिलेशनशिप्स जाणून घ्या करणबद्दल
2 कतरिनाची बहीण लवकरच बॉलिवूडमध्ये; चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित
3 शाल्व-शुभांगी गोखलेंची ‘पावरी’; शेअर केला मजेशीर व्हिडीओ
Just Now!
X