12 November 2019

News Flash

कपिल शर्मा एक एपिसोडसाठी घेतो इतके कोटी, जाणून व्हाल थक्क!

या भागात उदीत नारायण यांना पाहुणे म्हणून बोलावण्यात आले होत

छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय शो म्हणून ‘द कपिल शर्मा’ शो कडे आज पहिले जाते. या शोचा सूत्रसंचालक कपिल शर्मा याने त्याच्या विनोदाने अनेकांच्या मनात घर केले आहे. शो मधील कपिल शर्मा आणि त्याच्या इतर सहकाऱ्यांचे विनोद चाहत्यांच्या चांगल्याच पसंतीला उतरत असल्याचे पाहायला मिळत आहे. शोमध्ये येणारे कलाकार हे शोला आणखी रंजक करतात. मात्र सर्वांना खदखदून हसवणारा कपिल शर्मा एका एपिसोडसाठी किती पैसे घेत असले? असा प्रश्न अनेक प्रेक्षकांना पडतो. नुकताच चित्रीत झालेल्या भागामध्ये कपिल शर्माचे एका एपिसोडचे मानधन समोर आले आहे.

नुकताच द कपिल शर्मा शोमध्ये बॉलिवूड गायक उदित नारायण यांनी हजेरी लावली. कपिल उदित नारायण यांच्यासोबत मस्ती करताना दिसत होता. दरम्यान कपिलने मस्ती करत उदित नारायण यांच्या चेहऱ्यावर कमेंट केली. ‘तुमचा जितका गोड आवाज आहे, तितकाच निरागस चेहरा आहे. तुमच्या चेहऱ्याकडे पाहून असे वाटते की तुम्ही आज पर्यंत कधीच कोणाचे पैसे बुडवले नसतील आणि तुमचे पैसे खूप लोकांनी बुडवले असतील असे पण मला वाटते’ असे कपिल म्हणाला.

आणखी वाचा : गोविंदाने केले तिसरे लग्न, पत्नी म्हणाली…

कपिलची कमेंट ऐकून उदित नारायण यांनी लगेच प्रत्युत्तर दिले आहे. ‘तुला तर स्ट्रगल करायची गरच नाही. मी असं ऐकलय की तु एका एपिसोडसाठी एक कोटी रुपये घेतो’ हे उदित नारायण यांचे मजेशीर उत्तर ऐकून कपिल शर्माची बोलती बंद झाली. ते ऐकून सर्वत्र हास्याची लाट पसरली. मात्र कपिल शर्मा एका एपिसोडसाठी १ कोटी रुपये मानधन घेत असल्याचे समोर आले आहे.

First Published on October 15, 2019 11:43 am

Web Title: kapil sharma taking this much amount for one episode of kapil sharma show avb 95