एकीकडे इशा – अंबानी आनंद पिरामल यांच्या विवाहाची जोरदार चर्चा सुरू असताना दुसरीकडे कॉमेडीचा बाहशहा कपिल शर्मादेखील विवाहबंधनात अडकला. कपिलनं आपली प्रेयसी गिन्नी छत्रत हिच्याची विवाहगाठ बांधली. कुटुंबीय आणि मोजक्याच मित्रपरिवाराच्या उपस्थितीत जालंधरमध्ये कपिल आणि गिन्नीचा विवाहसोहळा पार पडला.

कपिलनं ट्विटरवर विवाहसोहळ्यातला फोटो शेअर केला. सुनील ग्रोव्हरसह अनेक सेलिब्रिटींनी कपिलवर शुभेच्छांचा वर्षाव केला. गेल्या काही वर्षांपासून कपिल गिन्नीला डेट करत होता. या विवाहसोहळ्यासाठी कृष्णा अभिषेक, सिमोना चक्रवर्ती, भारती सिंग असे काही मोजके सेलिब्रिटी उपस्थित होते. कपिल या सहकलाकारांसोबत मिळून लवकरच ‘द कपिल शर्मा शो’ घेऊन छोट्या पडद्यावर परतत आहे. सलमान खान स्वत: या शोचा निर्माता असणार आहे.

https://www.instagram.com/p/BrUAUG3gAO1/

 

या आठवड्याच्या सुरूवातीला अमृतसरमध्ये मेहंगी, संगीत, जागरण असे लग्नविधी आणि विवध कार्यक्रम पार पडले. त्यानंतर १२ डिसेंबरला कपिल प्रेयसी गिन्नीसोबत विवाहबंधनात अडकला. १४ तारेखला कपिलनं त्यांच्या कुटुंबीयांसाठी अमृतसरमध्ये रिसेप्शनचं आयोजन केलं आहे त्यानंतर बॉलिवूडसाठी मुंबईतदेखील तो रिसेप्शनचं आयोजन करणार आहे.