केंद्रीय अंमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) कॉमेडियन भारती सिंह हिच्या घरी छापा घातला होता. भारती सिंहच्या घरात अमली पदार्थ आढळून आल्यानंतर एनसीबीने तिला चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. चौकशीत भारतीने अमली पदार्थांचे सेवन करत असल्याची कबुली दिल्यानंतर एनसीबीने तिला ‘एनपीडीएस’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती. दरम्यान सोशल मीडियावर भारतीसह कॉमेडियन कपिल शर्मावर अनेकांनी निशाणा साधला. पण कपिल देखील शांत बसला नाही. त्याने ट्रोलर्सला सुनावले आहे.
एका यूजरने आता कपिलला देखील अटक करण्यात येईल या आशयाचे ट्विट केले होते. हे ट्विट पाहिल्यावर कपिलने त्या ट्रोलर्सला सुनावले आहे. पण उत्तर देताच कपिल पुन्हा ट्रोल झाला आहे.
‘भारतीची काय आवस्था झाली? जो पर्यंत पकडली गेली नाही तो पर्यंत ड्रग्ज घेत नव्हती. बहुतेक असेच काहीसे तुझ्यासोबत होणार आहे. जोपर्यंत पकडला जात नाही…’ या आशयाचे ट्विट ट्रोलरने केले होते.
त्यावर कपिल शर्माने उत्तर देत ‘पहिले तुझ्या मापाचे शर्ट शिवून घे’ असे म्हटले आहे. त्याचे हे उत्तर पाहून त्याला पुन्हा ट्रोल केले जात आहे.
चौकशीत भारती आणि तिचा पती हर्ष लिंबाचियाने अंमली पदार्थांचे सेवन करत असल्याची कबुली दिल्यानंतर एनसीबीने तिला ‘एनपीडीएस’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती. त्यानंतर या दोघांना मुंबई किल्ला कोर्ट न्यायालयाने १४ दिवसांची म्हणजे ४ डिसेंबरपर्यंत न्यायलयीन कोठडी सुनावली होती. ज्यानंतर भारती आणि तिच्या पतीने जामिनासाठी अर्ज केला होता. तो अर्ज मंजूर करण्यात आला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 26, 2020 4:50 pm