News Flash

‘त्याचे अश्रू खूप काही सांगून गेले’, अलीला पाहून कपिल ढसाढसा रडला

'कपिलबद्दल कानावर येणाऱ्या गोष्टी ऐकून मी अस्वस्थ झालो. मला पाहताच त्याला रडू कोसळलं. तो फक्त रडत होता, त्याच्या तोंडून शब्दही फुटत नव्हते.'

‘त्याचे अश्रू खूप काही सांगून गेले’, अलीला पाहून कपिल ढसाढसा रडला
अलीने नुकतीच कपिलची भेट घेतली.

‘मी जेव्हा कपिलच्या ऑफिसमध्ये पोहोचलो तेव्हा तो पडून होता. मला पाहताच त्याला रडू कोसळलं. तो फक्त रडत होता, त्याच्या तोंडून शब्दही फुटत नव्हते. त्याचे अश्रू खूप काही सांगून गेले’ कपिलच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या अली असगरनं नुकतीच त्याची भेट घेतली. अलीला आलेला अनुभव आणि कपिलची सध्याची खालावलेली प्रकृती बरंच काही सांगून जात आहे. ऐकेकाळी प्रेक्षकांना खळखळून हसवणारा कपिल मात्र स्वत: रडतोय, त्याची ही स्थिती पाहून त्याचे चाहतेही चिंतेत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून वादाच्या चक्रात अडकलेल्या कपिलच्या मागे सुरू असलेली साडेसाती काही केल्या संपल्याचं नाव घेत नाहीये. वर्षभरापूर्वी सहकलाकरांसोबत झालेलं भांडण, त्यानंतर त्यातल्या काही कलाकरांनी कपिलची सोडलेली साथ यामुळे तो आधीच खचला होता. त्यातून नुकतंच सुनील ग्रोवरसोबत झालेलं भांडण, पूर्वीश्रमीची प्रेयसी प्रितीनं केलेलं आरोप आणि अफवांचं पेव, पत्रकाराला केलेली शिवीगाळ यामुळे कपिलच्या नैराश्येत अधिकच भर पडत गेली. सहकलाकरांनी साथ सोडल्यानंतर कपिलनं मोठ्या हिंमतीनं त्यांच्या शिवाय आपला नवाकोरा शो सुरू केला होता पण, दुर्दैवानं तोही कपिलच्या वारंवार चित्रिकरण रद्द करण्याच्या सवयीमुळे चॅनेलला बंद करावा लागला.

वाचा : मी शिव्या देऊन स्वतःला शांत करतो- कपिल शर्मा

त्याच्याविषयीच्या माध्यमात चर्चिल्या जाणाऱ्या गोष्टी ऐकून अखेर त्याचा जूना सहकलाकार अली असगरनं नुकतीच त्याची भेट घेतली. ‘ मी महिनाभर देशाबाहेर असल्यानं इथे काय घडलं याची मला कल्पनाच नव्हती. पण, कपिलबद्दल कानावर येणाऱ्या गोष्टी ऐकून मी अस्वस्थ झालो. कपिलची तब्येत ठिक नाही ही गोष्ट मला प्रितीकडून कळाली इतकंच नाही तर तो कित्येक दिवस घरातून बाहेरही पडला नव्हता हेही मला तिनं सांगितलं. मी जेव्हा कपिलच्या ऑफिसमध्ये पोहोचलो तेव्हा तो पडून होता. मला पाहताच त्याला रडू कोसळलं. तो फक्त रडत होता, त्याच्या तोंडून शब्दही फुटत नव्हते. त्याला आमची खूप आठवण येते त्यातूनही त्याला प्रितीची खूप आठवण येत आहे . हे मला कळून चुकलं. काहीही झालं तरी आम्ही कपिलच्या सोबत आहोत. त्याची अवस्था एखाद्या लहान मुलासारखी झालीय ज्याला बरंच काही हवं आहे पण ते मिळत नाही’ असं अली एबीपीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला.

वाचा : ‘प्रितीने कपिलला एखाद्या लहान मुलाप्रमाणे सांभाळलेलं’

अलीच्या या प्रतिक्रियेनंतर कपिलच्या चाहत्यांच्या चिंता वाढल्या आहे. त्यानं या सगळ्यातून लवकरात लवकर बाहेर पडावं आणि पुन्हा त्याच जोमानं शो सुरू करावा इतकीच प्रार्थना त्याच्या चाहत्यांनी केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 17, 2018 2:09 pm

Web Title: kapil sharma was close to tears says ali ali asgar
Next Stories
1 सतीश कौशिक यांनी २५ वर्षांनंतर का मागितली बोनी कपूरची माफी?
2 सुनील ग्रोवरला लागली लॉटरी; या प्रसिद्ध दिग्दर्शकासोबत करणार काम
3 टेलिव्हिजनची बहुचर्चित जोडी अडकली विवाहबंधनात