09 August 2020

News Flash

लग्नानंतर वर्षभरातच कपिल शर्मा झाला बाबा

गिन्नी आणि कपिल शर्मा १२ डिसेंबर २०१८ मध्ये विविहबंधनात अडकले होते.

छोट्या पडद्यावरील विनोदवीर कपिल शर्माच्या घरी एका नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. कपिल शर्माची पत्नी गिन्नी छत्रथ हिने एका गोडंस मुलीला जन्म दिला आहे. कपिल शर्मानं ट्विट करत ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यासोबत शेअर केली आहे. लग्नाच्या वर्षभरातनंतर कपिल शर्मा बाबा झाला आहे. गिन्नी आणि कपिल शर्मा १२ डिसेंबर २०१८ मध्ये विविहबंधनात अडकले होते.

कपिल शर्माने ट्विट करत आनंदाची बातमी दिल्यानंतर सर्वसामान्य नेटकऱ्यांसह बॉलिवडूमधील कलाकारांनीही शुभेच्छा दिल्या. यामध्ये गुरू रंधवा, रकुल प्रित सिंह, सायना नेहवाल यांचा समावेश आहे.

आपल्या विनोदाने टेलिव्हिजन विश्व गाजवणारा विनोदवीर आणि अभिनेता कपिल शर्मा बऱ्याच काळापासून त्याच्या लव्ह लाइफबद्दल गुप्तता बाळगून होता. २०१७ मध्ये त्याने गिन्नीच्या फोटोसह एक खास ट्विट करत रिलेशनशिपमध्ये असल्याचं सांगितलं होतं. गिन्नी आणि कपिल शर्मा १२ डिसेंबर २०१८ मध्ये विविहबंधनात अडकले होते. पंजाब येथील जलंधरमध्ये महाविद्यालयीन प्रशिक्षण घेत असताना या दोघांची भेट झाली. गिन्नी आणि कपिल ‘हस बलिये’ कार्यक्रमात एकत्र दिसले होते. या कार्यक्रमादरम्यान त्यांच्यात जवळीक निर्माण झाली. या कार्यक्रमात विजेतेपद त्यांना मिळाले नाही. मात्र, त्यांच्या कामाची तेव्हा बरीच प्रशंसा झाली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 10, 2019 9:44 am

Web Title: kapil sharma wife ginni chatrath blessed with a baby girl nck 90
Next Stories
1 बोल्ड मलायका आहे ‘न्यूड योगा गर्ल’ची फॉलोअर
2 ‘तान्हाजी’चा मराठी टीझरही प्रदर्शित
3 “बलात्काऱ्यांविरोधात खटला चालवून लोकांचे पैसे कशाला वाया घालवायचे?”, वहीदा रहमान यांचा सवाल
Just Now!
X