22 October 2019

News Flash

कपिल पुन्हा नंबर १, चाहत्यांसाठी लिहिली भावनिक पोस्ट

अवघ्या दोन आठवड्यातच तो पुन्हा एकदा छोट्या पडद्यावरचा सुपरस्टार झाला

कॉमेडीचा बादशहा कपिलसाठी २०१८ हे वर्ष अनेक चढ- उतारांचं होतं. एक नव्हे तर अनेक कारणांमुळे तो वादात सापडला होता. एकेकाळी नंबर १ असलेला कपिल फटक्यात खाली आला. सहकलाकार साथ सोडून गेले नवीन शोदेखील दोन एपिसोडनंतर बंद पडला. या सगळ्या कारणांमुळे कपिल वर्षभरासाठी छोट्या पडद्यापासून दूर निघून गेला. मात्र आपला द कपिल शर्मा शो घेऊन तो गेल्या महिन्यात छोट्या पडद्यावर परतला अवघ्या दोन आठवड्यातच तो पुन्हा एकदा छोट्या पडद्यावरचा सुपरस्टार ठरला.

त्याचा नवा शो टीआरपीच्या यादीत पहिल्या स्थानी आला आणि कपिलनं आपलं मनोरंजन विश्वातलं स्थान परत मिळवलं. शो टीआरपीच्या यादीत आल्यानंतर कपिलनं सोशल मीडियावर भावनिक पोस्ट लिहिली. ‘तुम्ही दिलेल्या भरभरून प्रेमाबद्दल खूप खूप धन्यवाद. तुमच्या चेहऱ्यावर आनंद आणण्यासाठी आम्ही खूप मेहनत करू असं लिहित कपिलनं चाहत्यांचे आभार मानले आहेत. तसेच तुमच्या प्रेमामुळे आम्ही पहिलं स्थान पुन्हा मिळवलं आहे असंही कपिलनं म्हटलं. पहिल्याचं एपिसोडनंतर टीआरपीच्या यादीत अव्वल आल्यानंतर कपिल आणि त्याच्या टीमनं सेटवर सेलिब्रिशनही केलं.

कपिलसोबतच्या वादामुळे काही सहकलाकार द कपिल शर्मा शो सोडून गेले. तर या शोच्या निमित्तानं कपिलचा प्रतिस्पर्धी कृष्णा अभिषेक आणि भारती सिंग मात्र एकत्र आले.

First Published on January 11, 2019 2:28 pm

Web Title: kapil sharma writes a heartfelt post after show gain top number