News Flash

इटलीतील या पंजाबी पंडितांनी लावलं ‘विरुष्का’चं लग्न

विराट-अनुष्काच्या लग्नाचे विधी पार पाडणार आहोत हे त्यांनाही माहित नव्हतं.

विराट कोहली, अनुष्का शर्मा

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या लग्नाच्याच चर्चा गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळत आहेत. मोजक्या लोकांच्या उपस्थितीत इटलीत पार पडलेल्या या लग्नसोहळ्याबद्दलच्या लहानसहान गोष्टी जाणून घेण्यासाठी विरुष्काचे चाहते उत्सुक आहेत. विरुष्काचं लग्न लावणारे पंडितसुद्धा आता जणू सेलिब्रिटीच झाले आहेत. त्यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी लोक सोशल मीडियावर सर्च करत आहेत तर अनेकजण त्यांना शुभेच्छासुद्धा देत आहेत.

४६ वर्षांचे पवन कुमार कौशल यांनी विराट- अनुष्काच्या लग्नाचे विधी पार पाडले. मूळचे पंजाबमधील कपूरथाळा जिल्ह्यातील असलेले पंडित पवन कुमार कौशल गेल्या २५ वर्षांपासून इटलीत राहत आहेत. विशेष म्हणजे आपण विराट-अनुष्काच्या लग्नाचे विधी पार पाडणार आहोत हे त्यांनाही माहित नव्हतं. जेव्हा ते घरातून विवाहस्थळासाठी निघाले, तेव्हा विराटच्या आईकडून वर आणि वधूची माहिती कळल्याचं त्यांनी सांगितलं.

वाचा : ‘या’ चित्रपटातून मेहुण्याला लाँच करत आहे सलमान 

सेलिब्रिटींच लग्न पार पाडल्यामुळे आपल्याला प्रसिद्धी मिळाल्याचंही पवन कुमार यांनी सांगितलं. मात्र, प्रसिद्धीसोबतच इटलीतल्या इतर भारतीय पंडितांमध्ये माझ्याबद्दल इर्षेची भावना निर्माण झाल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 14, 2017 6:46 pm

Web Title: kapurthala man pawan kumar kaushal main priest at virat anushka wedding
Next Stories
1 मालमत्तेबाबत सायरा बानो यांनी केला मोठा खुलासा
2 ‘ऑफिस बॉय’ झाला गीतकार
3 …या आहेत सब्यसाचीच्या सेलिब्रिटी ब्राइड
Just Now!
X