News Flash

करण जोहरच्या घरातील ‘त्या’ पार्टीबाबत होणार का चौकशी? एनसीबीचे अधिकारी म्हणाले…

करण जोहरच्या घरी २०१९ मध्ये झालेल्या पार्टीचा व्हिडीओ गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर पुन्हा एकदा व्हायरल होत आहे.

निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच्या घरी २०१९ मध्ये झालेल्या पार्टीचा व्हिडीओ गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर पुन्हा एकदा व्हायरल होत आहे. करणच्या घरी ड्रग्ज पार्टी झाल्याची चर्चा नेटकऱ्यांमध्ये होत असून त्या व्हिडीओची चौकशी एनसीबी करणार असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र हा व्हिडीओ एनसीबीच्या तपासाचा विषय नसल्याचं एनसीबीच्या उपमहासंचालकांनी स्पष्ट केलं. सध्या सुरू असलेल्या प्रकरणाशी त्या व्हिडीओचा काहीच संबंध नसल्याचं त्यांनी सांगितलं.

२०१९ मध्ये झालेल्या करण जोहरच्या पार्टीत बॉलिवूडच्या मोठमोठ्या सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती. दीपिका पदुकोण, विकी कौशल, रणबीर कपूर, वरुण धवन, झोया अख्तर, शाहिद कपूर, मलायका अरोरा यांच्यासहित अनेक सेलिब्रिटी या पार्टीत उपस्थित होते.

आणखी वाचा : नेत्रसुखद स्थळांवर चित्रीत झालेल्या या वेब सीरिज पाहिल्यात का?

दुसरीकडे एनसीबीच्या विशेष पथकाने कुलाबा येथील विश्राम गृहावर अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि तिची मॅनेजर करिश्मा प्रकाश यांच्याकडे चौकशी केली. दोघींना समोरासमोर आणून अंमलीपदार्थांचे सेवन, पुरवठा आदीबाबत प्रश्न विचारण्यात आले. एनसीबीच्या मुंबई विभागाकडून अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूशी अंमलीपदार्थांचा संबंध आहे का, याबाबत तपास सुरू आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 27, 2020 4:51 pm

Web Title: karan johar 2019 party video not related to bollywood drugs probe says ncb official ssv 92
Next Stories
1 सुशांत मृत्यू प्रकरणावर येतोय चित्रपट; शक्ती कपूर साकारणार ही भूमिका
2 “आपल्या रिलेशनशिपमुळे मी प्रसिद्ध झाले”; अभिनेत्रीने मानले ‘बिग बॉस’चे आभार
3 ‘बिग बॉस’ फेम हिमांशी खुरानाला करोना; शेतकऱ्यांच्या आंदोलनात झाली होती सहभागी
Just Now!
X