News Flash

अभिषेक- ऐश्वर्याचा कॅज्युअल लूक

कारमध्ये बसलेले अभिषेक आणि ऐश्वर्या फार क्युट दिसत होते

ऐश्वर्या राय बच्चन आणि मनिष मल्होत्रा

बॉलिवूड इंडस्ट्रीत अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन या जोडप्याची नेहमीच चर्चा असते. अभी- अॅश दोघंही मंगळवारी रात्री त्यांचा मित्र असणाऱ्या फॅशन डिझायनर मनिष मल्होत्राच्या घरी गेले होते. यावेळी ऐश्वर्याने डेनिमचा ड्रेस घातला होता. ऐश्वर्या या कॅज्युअल लूकमध्येही फार आकर्षक दिसत होती. तिचे आणि अभिषेकचे मनिषच्या घरी जाणारे फोटो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

ऐश्वर्या आणि मनिष एकमेकांना अनेक वर्षांपासून ओळखतात. त्यामुळे साहजिकच त्यांच्यात घनिष्ट मैत्री आहे. या पार्टीत ऐश्वर्या आणि अभिषेकसोबत करण जोहरही होता. गेल्या अनेक वर्षांपासून मनिष कलाकारांसोबत काम करत असल्यामुळे अनेकांसोबतच त्याचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत.

कारमध्ये बसलेले अभिषेक आणि ऐश्वर्या फार क्युट दिसत होते. ऐश्वर्याने यावर्षी तिचा वाढदिवस कोणतीही गाजावाजा न करता अगदी साधेपणाने साजरा केला. ४५व्या वर्षात पदार्पण केलेल्या ऐश्वर्याने वाढदिवशी मुलगी आराध्या आणि आईसह सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले होते. लवकरच ऐश्वर्या अनिल कपूर आणि राजकुमार राव यांच्यासोबत फॅनी खानमध्ये दिसणार आहेत.

आराध्याच्या जन्मानंतर ऐश्वर्या पाच वर्षे रुपेरी पडद्यापासून दूर राहिली. त्यानंतर तिने ‘जज्बा’ सिनेमातून पुनरागमन केले. अपहरण झालेल्या आपल्या मुलीची सुटका करणाऱ्या धाडसी आणि कर्तव्यनिष्ठ आईच्या भूमिकेत ती दिसली. त्यानंतर ‘सरबजीत’ सिनेमात पाकिस्तानमधील तुरुगांत असलेल्या भावाच्या सुटकेसाठी जीवाचे रान करणाऱ्या बहिणीची भूमिकाही तिने लीलया पार पाडली.

या दोन भूमिकानंतर ‘ऐ दिल है मुश्किल’मधील तिच्या ग्लॅमरस भूमिकेने तर पुन्हा एकदा चाहत्यांना तिच्या प्रेमात पाडले. या सिनेमांसाठी तिला बरेच पुरस्कारही मिळाले. आपल्या संपूर्ण कारकिर्दीत प्रेमाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव करणाऱ्या चाहत्यांचे आभार मानायला ही अभिनेत्री कधीच विसरत नाही. एखादा पुरस्कार जिंकल्यावर ती पती अभिषेक, सासरे अमिताभ बच्चन आणि आपल्या कुटुंबाचा उल्लेख आवर्जून करते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 8, 2017 8:40 pm

Web Title: karan johar aishwarya rai bachchan and abhishek bachchan at manish malhotra
Next Stories
1 अभिनेता स्वप्नील जोशीची पहिली टेलिव्हिजन निर्मिती ‘स्टार प्रवाह’वर
2 नोटाबंदीवरुन प्रकाश राज यांचा केंद्र सरकारवर पुन्हा एकदा हल्लाबोल
3 Tiger Zinda Hai: सलमान मला शिवीगाळ करायचा – अली अब्बास जफर
Just Now!
X