26 January 2021

News Flash

‘माझ्या प्रिय मित्रा…’, मधुर भांडारकर यांच्या आरोपांवर करण जोहरची प्रतिक्रिया

जाणून घ्या काय आहे करण जोहरची पोस्ट

बॉलिवूडमध्ये चित्रपटांच्या नावावरुन अनेकदा वाद झाल्याचे पाहायला मिळते. काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी करण जोहर आणि अपूर्व मेहता यांच्यावर चित्रपटाचं नाव कॉपी केल्याचा आरोप केला होता. आता करण जोहरने पोस्ट शेअर करत मधुर भांडारकर यांची माफी मागितली आहे.

करणने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ‘माझ्या प्रिय मित्रा’ असे म्हटले असून मधुर भांडारकर यांना ती पोस्ट टॅग केली आहे. ‘प्रिय मधुर, आपण गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखतो आणि आपण या इंडस्ट्रीचा एक भाग आहोत. मी तुझ्या कामाचा खूप मोठा चाहता आहे. मला माहिती आहे तू माझ्यावर नाराज आहात. मी तुझी माफी मागतो. माझ्या सीरिजचे नाव Fabulous Lives of Bollywood Wives असे ठेवले आहे. हे पूर्णपणे एक वेगळे टायटल आहे’ या आशयाची पोस्ट करणने केली आहे.

पुढे करणने ‘या सीरिजची कथा, फॉरमॅट आणि टायटल हे पूर्णपणे वेगळे आहे. या सीरिजचा तुझ्या चित्रपटावर परिणाम होणार नाही. मला आशा आहे की आपण हा वाद विसरुन पुढे जाऊ’ असे म्हटले आहे.

आणखी वाचा- करण जोहरने चित्रपटाच्या नावाची केली कॉपी; मधुर भांडारकरांचा आरोप

काय आहे प्रकरण?
मधुर भांडारकर सध्या कलाविश्वातील सुपरस्टार्सच्या पत्नींवर आधारित चित्रपटाची निर्मिती करत आहेत. या चित्रपटाचं नाव ‘बॉलिवूड वाइव्ज’ असं आहे. मात्र, याच काळात करण जोहर आणि अपूर्व मेहता यांनी ‘Fabulous Lives of Bollywood Wives’ या सीरिजची घोषणा केली. मात्र, या सीरिजच्या नावावरुन मधुर यांनी संताप व्यक्त केला.

काय म्हणाले होते मधुर भांडरकर?
“करण जोहर आणि अपूर्व मेहताने मला या सीरिजचं नाव ‘बॉलिवूड वाइव्ज’ असं ठेवलं तर चालेल का? असं विचारलं होतं. त्यावेळी मी देखील याच नावाने चित्रपट करत आहे, त्यामुळे हे नाव ठेऊ नका, असं मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं होतं. मात्र, तरीदेखील त्यांनी त्यांच्या सीरिजचं नाव ‘Fabulous Lives of Bollywood Wives’ असं ठेवलं. हे अत्यंत चुकीचं आहे. कृपा करुन माझ्या प्रोजेक्टचं नुकसान करु नका. माझी नम्र विनंती आहे तुम्ही या सीरिजचं नाव बदला” असे मधुर भांडरकर ट्विट करत म्हणाले होते.

दरम्यान, करण जोहरच्या या सीरिजचा पहिला सीजन २७ नोव्हेंबरला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होत आहे. या सीरिजमध्ये सीमा खान, महिप कपूर, भावना पांडे आणि नीलम कोठारी यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात आला आहे. तर मधुर भांडारकर यांनी ‘बॉलिवूड वाइव्ज’ या चित्रपटाची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे त्यांनी हे नाव सेन्सॉर बोर्डामध्ये रजिस्टर देखील केले आहे. या चित्रपटात शाहरूख खानची पत्नी गौरी खान, शाहीद कपूरची पत्नी मीरा राजपूत आणि राजेश खन्नाची पत्नी डिंपल खन्ना यांच्या आयुष्यावर हा आधारित असल्याचं सांगण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 27, 2020 11:08 am

Web Title: karan johar apologises in title controversy madhur bhandarkar avb 95
Next Stories
1 Birthday Special : बप्पी लहरी एवढं सोनं का घालतात? जाणून घ्या कारण
2 कंगना रणौतवर पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांनी केलं भाष्य, म्हणाले…
3 टीव्ही शोमध्ये जाणं तुम्ही का टाळता?; रेखा म्हणाल्या, “मी काही दाखवायची वस्तू…”
Just Now!
X