19 September 2020

News Flash

‘आपण कोणत्या देशात राहतो?’ करण जोहरच्या प्रश्नावर मुलाने दिलं ‘हे’ मजेशीर उत्तर

करण मुलांच्या अभ्यासाची उजळणी घेत होता

निर्माता- दिग्दर्शक करण जोहरच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग म्हणजे त्याची मुलं. सध्या लॉकडाउन असल्यामुळे करण घरात राहून त्याचा जास्तीत जास्त वेळ मुलांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासोबतच त्याच्याविषयीचे अनेक किस्से, व्हिडीओ तो सोशल मीडियावर शेअर करत आहे. यामध्येच त्याने यश आणि रुहीचा एक नवीन व्हिडीओ शेअर केला आहे.

लोकप्रिय स्टारकिडमध्ये करणच्या यश आणि रुही कायम चर्चेत असतात. सध्या लॉकडाउनमुळे करण घरात असल्यामुळे दोन्ही मुलं त्यांच्या वडिलांसोबत खेळतांना, मस्ती करताना दिसत आहेत. तसंच करण सुद्धा त्याचा जास्तीत जास्त वेळ मुलांना देण्याचा प्रयत्न करतोय. यामध्येच तो खेळखेळता मुलांना काही चांगल्या गोष्टीही शिकवत आहे.

 

View this post on Instagram

 

Part quiz! Part school memories! #lockdownwiththejohars ..PS don’t miss his answer about his country!

A post shared by Karan Johar (@karanjohar) on

करणने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तो मुलांच्या अभ्यासाची उजळणी घेत असून तो यशला आपला देश कोणता असा प्रश्न विचारतो. यावेळी खेळण्यात गुंग असलेल्या लहानग्या यशने एक मजेशीर उत्तर दिलं. यश आपला देश कोणता सांग? अशा प्रश्न करणने विचारला. त्यावर अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान हे आपल्या देशाचं नाव आहे, असं उत्तर यशने दिलं.

दरम्यान, यश लहान असल्यामुळे त्याने असं उत्तर दिलं असलं तरीदेखील करणने त्याला आपला देश कोणता, आपल्या देशाचं नाव काय हे नीट समजावून सांगितलं.त्यामुळे सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर लोकप्रिय होत आहे. करण बऱ्याच वेळा त्याच्या मुलांचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. त्यामुळे चाहत्यांमध्येदेखील स्टारकिड यश आणि रुही यांची लोकप्रियता पाहायला मिळते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2020 11:33 am

Web Title: karan johar asks his kids country name got shocking reply ssj 93
Next Stories
1 फोटोमधील ‘या’ चिमुकलीला ओळखलंत का? आज आहे मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री
2 ‘प्रस्थानम’ चित्रपटातील अभिनेत्याच्या आईला करोनाची लागण
3 ‘श्रीमंत देश लॉकडाउन वाढवू शकतात, पण गरीब देश…’; चेतन भगतचा सरकारला टोला
Just Now!
X