News Flash

कंगनाला ‘शट-अप’ म्हणताच नेटीझन्सनी करणला केलं ट्रोल

कंगनाची मुलाखत ऐकून करणचा राग अनावर!

बॉलिवूडमध्ये सध्या कोणत्या अभिनेत्रीची सर्वांत जास्त चर्चा होत असेल तर ती म्हणजे कंगना रणौत. ती चर्चेत राहण्याचं कारण म्हणजे ‘इंडिया टीव्ही’च्या ‘आप की अदालत’ कार्यक्रमात तिने केलेले खुलासे. तिने हृतिक रोशन, राकेश रोशन, आदित्य पांचोली आणि करण जोहरसंदर्भात बेधडक वक्तव्यं या मुलाखतीत केली. दिग्दर्शक करण जोहरशी असलेला तिचा वाद सर्वांनाच माहित आहे. घराणेशाहीच्या मुद्द्यावरुन करणवर टीका करत त्याला ‘मूव्ही माफिया’ असंच तिने म्हटलं होतं. यासंदर्भात तिने प्रतिक्रिया दिली असता करणनेही ट्विटरवरुन तिला उत्तर दिलंय. मात्र या उत्तरानंतर करणलाच ऑनलाइन ट्रोलला सामोरं जावं लागलंय.

करणने तुला त्याच्या चित्रपटात भूमिका दिली नाही म्हणून तू त्याला ‘मूव्ही माफिया’ म्हटलंस का?, असा प्रश्न तिला विचारण्यात आला. त्यावर कंगनाने उत्तर दिलं की, ‘मी त्यांच्यासोबत ‘उंगली’ या चित्रपटासाठी काम केलं. यामध्ये माझी दहा मिनिटांची भूमिका होती. माझ्या आयुष्यातील हा सर्वांत फ्लॉप चित्रपट होता, त्यामुळे मला आता त्यांच्याकडून कोणतेच काम नकोय.’ कंगनाने दिलेल्या या उत्तरावर करणने ट्विटरच्या माध्यमातून राग व्यक्त केला.

Next Stories
1 ‘कंगनाची मुलाखत म्हणजे जणू ‘सर्कस’च!’
2 या अभिनेत्रीमुळे हृतिक- कंगनाचे झाले होते ब्रेकअप
3 तर मी ऑस्कर सोहळ्यालाही जाणार नाही- कंगना रणौत
Just Now!
X