22 October 2020

News Flash

अनुष्का शर्माच्या प्रेग्नंसी पोस्टवर करण जोहरची कमेंट, झाला पुन्हा ट्रोल

सुशांत सिंह राजूपतच्या आत्महत्येनंतर करण जोहरला नेपोटीझम प्रमोटर म्हणून ट्रोल केले जात आहे.

बॉलिवूड अभिनेत्री करीन कपूर खान पाठोपाठ अभिनेत्री अनुष्का शर्माने ती प्रेग्नंट असल्याचे सांगितले. तिने सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती दिली होती. ‘जानेवारी २०२१ पासून आम्ही दोनाचे तीन होणार’, असे कॅप्शन देत अनुष्काने विराटसोबतचा फोटो शेअर केला. अनुष्काच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत तिला शुभेच्छा दिल्या. पण बॉलिवूड चित्रपट निर्माता, दिग्दर्शक करण जोहरने केलेल्या कमेंटमुळे त्याला ट्रोल करण्याता आले आहे.

 

View this post on Instagram

 

And then, we were three! Arriving Jan 2021

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma) on

करण जोहरने अनुष्काच्या पोस्टवर ‘प्रेम प्रेम आणि खूप जास्त प्रेम’ या आशयाची कमेंट केली होती. त्याच्या या कमेंटवर अनेकांनी उत्तर देत त्याला ट्रोल करण्यात आले आहे. एका युजरने करण जोहर अनुष्का आणि विराटच्या मुलाची वाट बघत आहे. कारण त्याला बॉलिवूडमध्ये लाँच करायचे आहे असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने स्टारकिडला लाँच करण्यासाठी प्लॅन करत आहेस? स्टुडंट ऑफ द इअर ४२० असे म्हणत ट्रोल केले आहे.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर घराणेशाही हा वाद पेटून उठला. सुशांतच्या चाहत्यांनी अनेक स्टारकिड्स आणि बॉलिवूडमधील लोकप्रिय चित्रपट निर्माते, दिग्दर्शक यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली. विशेष करुन करण जोहरवर नेपोटीझम प्रमोटर म्हणून करण जोहरला ट्रोल करण्यात आले.

करणने ट्रोलिंगला कंटाळून त्याचा कमेंट बॉक्स प्रायवेट केला होता. तसेच तो सोशल मीडियापासूनही लांब होता. आता पुन्हा करण सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. तसेच करणने अनुष्काच्या पोस्टवर कमेंट केल्यामुळे त्याला पुन्हा ट्रोल करण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 30, 2020 10:39 am

Web Title: karan johar get trolled as he wishes anushka sharma avb 95
Next Stories
1 ‘रात्रीस खेळ चाले – २’ मालिका बंद; शेवंता झाली भावूक, म्हणाली…
2 ‘मला क्लॉस्ट्रोफोबिया आहे’, सुशांतचा जुना व्हिडीओ व्हायरल
3 ‘कौन बनेगा करोडपती’च्या सेटवरील बीग बिंचा ‘कूल लूक’ ; पाहा KBC 12चा प्रमो
Just Now!
X