News Flash

…तर करण जोहर तुरुंगात जाऊ शकतो

नोटीसमध्ये सगळ्यांकडून दहा दिवसांत उत्तर मागितले आहे

करण जोहर

बॉलिवूडचा आघाडीचा निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरने सिगरेट अँड अदर टोबॅको प्रॉडक्ट्स अॅक्ट अर्थात कोटपा कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्याला पाच वर्षांची शिक्षा आणि दंड होऊ शकतो.

करण जोहर आणि रोहित शेट्टी सध्या स्टार प्लसवरील इंडियाज नेक्स्ट सुपरस्टार या रिअॅलिटी शोचे प्रशिक्षक आहेत. ‘इंडियाज नेक्स्ट सुपरस्टार्स’ हा कार्यक्रम तरुण वर्गात फार पसंत केला जातो. या रिअॅलिटी शोमध्ये कमला पसंदचं प्रमोशन केलं जात आहे. या शोमध्ये दाखवण्यात येणारी कमला पान पसंदची जाहिरात करणला आणि वाहिनीच्या मालकांना गोत्यात आणू शकते. करण जोहर आणि रोहित शेट्टी ‘स्टार प्लस’वरील चर्चित रिअॅलिटी शो ‘इंडियाज नेक्स्ट सुपरस्टार्स’चे जज आहेत.

पण शोमध्ये दाखवल्या जाणाऱ्या कमला पसंद पान मसाल्याची जाहिरातीमुळे दिल्ली आरोग्य विभागाने धर्मा प्रॉडक्शन, अँडमोल प्रॉडक्शन कंपनीला नोटीस पाठवली आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला धर्मा प्रॉडक्शनचं नाव येते. त्यामुळे या प्रकरणात कोटपा कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी करणला दुसऱ्यांदा नोटीस पाठवण्यात आली आहे. यात दोषी आढळल्यास त्याला ५ वर्षांचा तुरुंगवास आणि दोन हजार रुपयांचा दंड होऊ शकतो. या कार्यक्रमाशी संबंधित सगळ्यांना ‘सेरोगेटेड अॅड’ दाखवल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आलं आहे. नोटीसमध्ये सगळ्यांकडून दहा दिवसांत उत्तर मागितले आहे. अन्यथा दिल्लीचे आरोग्य विभाग त्यांच्याविरोधात केस दाखल करेल.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी कार्यक्रमाच्या सूत्रसंचालकाने करणला, या शोमध्ये प्रियांका पाहुणी म्हणून येणार आहे तर कंगनालासुद्धा त्यासाठी आमंत्रण देण्यात येणार का, असा सवाल करताच ‘ऐ दिल है मुश्किल’ फेम दिग्दर्शक यावर आता काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले. कदाचित असा एकही प्रश्न नसेल ज्याचे उत्तर करणकडे नाही. आपल्या बुद्दी चातुर्यासाठी प्रसिद्ध असलेल्या करणने दिलेल्या उत्तरामुळे भविष्यात कदाचित कंगना आणि त्याच्यामधील वादळ क्षमण्याची शक्यता असेल असेच म्हणावे लागेल.

करण म्हणाला की, ‘स्टार प्लसने तिला आमंत्रण दिले तर आम्हालाही त्याचा आनंदच आहे. आमचं मन खूप मोठं असून सर्वांसाठी घराचे दरवाजे खुले आहेत. ज्यांना कोणाला आमंत्रण जाईल त्यांनी आवर्जून शोमध्ये यावे अशीच आमची इच्छा आहे. आम्ही प्रेम आणि आदराने त्यांचे स्वागत करू.’ करणच्या या वक्तव्यावर कंगना काय उत्तर देणार हेसुद्धा पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2018 3:01 pm

Web Title: karan johar lands in fresh trouble slapped with legal notice may get 5 years jail here is why
Next Stories
1 PHOTOS : ‘पद्मावत’च्या स्पेशल स्क्रीनिंगसाठी दीपिकाला मिळाली रणवीरची साथ
2 सोनिया गांधींच्या भूमिकेत दिसणार ‘ही’ परदेशी अभिनेत्री
3 Padmaavat Release Updates : ‘पदमावत’चा विरोध टोकाला, जाळपोळ आणि तोडफोडीचे सत्र सुरूच
Just Now!
X