काही दिवसांपूर्वी बॉलिवूड चित्रपट निर्माता करण जोहर नव्या चित्रपटाची घोषणा करणार असल्याचे म्हटले जात होते. आता करणने त्याच्या आगामी चित्रपटाची घोषण केल्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळते. नुकताच करणने सोशल मीडियावर आगामी चित्रपटाची घोषणा करत चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे.

करण जोहर आणि त्याची संपूर्ण टीम आगामी चित्रपटाच्या कामामध्ये व्यग्र आहे. या चित्रपटाचे नाव ‘Liger: साला क्रॉसब्रीड’ असे आहे. या चित्रपटात दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडा आणि बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन पुरी जगन्नाथ हे करणार असून चित्रपटाची निर्मिती करण जोहर करणार आहे. हा चित्रपट हिंदी, तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Karan Johar (@karanjohar)

आणखी वाचा- ‘कलाकार म्हणून नाइट शिफ्टमध्ये काम करणे…’, कंगनाचे ट्वीट व्हायरल

या चित्रपटातील फर्स्ट लूक करण जोहरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या पोस्टरमध्ये विजय देवरकोंडा फायटरच्या रुपात दिसत आहे. त्याचा हा लूक सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. विजयचा हा लूक पाहून चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळते.