News Flash

करण जौहर वैतागला; टीकाकारांना टाळण्यासाठी शोधला ‘हा’ मार्ग

करण जौहर विरोधात नेटकऱ्यांनी बांधला मोर्चा

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने गळफास घेऊन आत्महत्या केली. बॉलिवूडमधील घराणेशाहीला कंटाळून त्याने आत्महत्या केली असं म्हटलं जात आहे. सिनेसृष्टीतील घराणेशाहीसाठी निर्माता करण जौहरला जबाबदार धरले जात आहे. त्याच्यावर सोशल मीडियाद्वारे तुफान टीका केली जात आहे. या टीकाकारांपासून वाचण्यासाठी त्याने स्वत:चा फोन नंबर बदलला. तसेच बॉलिवूडमधील आपल्या मित्रमंडळींना त्याने अनफॉलो केलं आहे.

करण जौहर आपल्या ट्विटर अकाउंटवर १०८ कलाकारांना फॉलो करत होता. यामध्ये आलिया भट्ट, वरुण धवन, दीपिका पादूकोण, अर्जुन कपूर, सिद्धार्थ मल्होत्रा असे कलाकार होते. विशेष म्हणजे यांपैकी अनेक कलाकारांवर घराणेशाहीचा आरोप केला जातो. यापैकी अनेकांना स्वत: करणनेच लॉन्च केले होते. मात्र या सर्वांना आता त्याने अनफॉलो केलं आहे. आता केवळ तो अमिताभ बच्चन, शाहरुख खान, अक्षय कुमार अशा आठच कलाकारांना फॉलो करत आहे.

करण जौहरची ही कृती सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. मात्र याने विरोधकांवर फारसा प्रभाव पडलेला नाही. त्यांनी आपला विरोध आणखी तीव्र केला आहे. अलिकडेच करण जौहर व सलमान खान विरोधात एक ऑनलाईन पिटिशन जारी करण्यात आली. आश्चर्याची बाब म्हणजे यावर दोन दिवसांत तब्बल २९ लाख लोकांनी सह्या केल्या. यावरुन लोकांच्या मनातील करण विरोधातील राग दिसून येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 18, 2020 5:18 pm

Web Title: karan johar now follows just 8 twitter accounts mppg 94
Next Stories
1 सुशांतला न्याय द्या; सलमान खान विरोधात २९ लाख लोकांनी केल्या सह्या
2 Video : गर्लफ्रेंडच्या नावाऐवजी आता बिग बॉसचा डोळा; ब्रेकअपनंतर पारस छाब्राने मिटवला टॅटू
3 ऐश्वर्याचा कोणता गुण सर्वाधिक आवडला? जया बच्चन म्हणाल्या…
Just Now!
X