23 February 2019

News Flash

निक प्रियांकापेक्षा लहान असल्यानं काय बिघडलं?- करण जोहर

वयातील अंतरामुळे अनेकांनी मीम्स किंवा सोशल मीडियावर प्रतिक्रियांच्या माध्यमातून प्रियांकाची खिल्लीही उडवली होती.

प्रियांका चोप्रा- निक जोनास

प्रियांका आणि निक जोनास हे नेहमीच वेगवेगळ्या कारणानं सोशल मीडियावर चर्चेत असतात. त्यातलं प्रमुख कारण म्हणजे या दोघांमधील वयाचं अंतर. प्रियांका ३६ वर्षांची तर निक २६ वर्षांचा आहे त्यामुळे हे नातं अनेकांना खटकलं. वयातील अंतरामुळे अनेकांनी मीम्स किंवा सोशल मीडियावर प्रतिक्रियांच्या माध्यमातून प्रियांकाची खिल्लीही उडवली.

वाचा : नियतीने आम्हाला एकत्र आणलं – निक जोनास

मात्र, ‘कुछ तो लोग कहेंगे’ म्हणत या दोघांनीही लोकांच्या कडवट प्रतिक्रियांकडे दुर्लक्ष केलं. नुकतंच प्रियांकाच्या मदतीसाठी दिग्दर्शक करण जोहरही धावून आला आहे. ‘नात्यांमध्ये वय किंवा इतर गोष्टी या दुय्यम असतात. तुमचा जोडीदार लहान आहे किंवा फार मोठा आहे यावर चर्चा का करावी. जर तुमचा जोडीदार उत्तम असेल आणि तुम्ही त्याच्यासोबत सुखी असाल तर वयानं काय फरक पडतो? मुलगी ही मुलापेक्षा लहानच असली पाहिजे हा नियम कोणी तयार केला? माझ्या लेखी या गोष्टींना काहीच किंमत नाही’ असं म्हणत करणनं प्रियांकाची पाठराखण केली आहे.

निक आणि प्रियांका गेल्या वर्षभरापासून एकमेकांना डेट करत आहेत. गेल्याच महिन्यात मुंबईत या दोघांचा पारंपारिक पद्धतीनं रोकाही पार पडला.

First Published on September 11, 2018 12:04 pm

Web Title: karan johar on priyanka chopra being older to nick jonas