20 February 2019

News Flash

यश- रुहीच्या पहिल्या वाढदिवसाला असेल ‘यांची’ खास हजेरी

करणने केली जंगी तयारी

करण जोहर आणि यश- रुही

निर्माता- दिग्दर्शक करण जोहरच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग म्हणजे त्याची मुलं. अशा या लाडक्या मुलांविषयी म्हणजे यश आणि रुहीच्या आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी बरेचजण उत्सुक असतात. यश- रुहीचा आज पहिला वाढदिवस आहे . आपल्या जुळ्या मुलांच्या पहिल्या वाढदिवसाची करणने जंगी तयारी केली आहे. त्यासाठी विशेष प्लॅनसुद्धा त्याने केला आहे.

‘डेक्कन क्रॉनिकल’ने दिलेल्या माहितीनुसार, करणने वाढदिवसाच्या पार्टीला बॉलिवूडच्या सर्व स्टारकिड्सना आमंत्रित करण्याचे ठरवले आहे. यश- रुहीसाठी तो दिवस खास असल्याने करण त्यासाठी बरीच मेहनत घेणार आहे. या स्टारकिड्सच्या यादीत शाहरुख खानचा मुलगा अबराम, करिना कपूरचा तैमुर, आमिर खानचा मुलगा आझाद, लारा दत्ताची मुलगी सायरा आणि तुषार कपूचा मुलगा लक्ष्य यांचा समावेश आहे. आईवडिलांसोबत ऑस्ट्रेलियाच्या सफरीवर असल्याने ऐश्वर्या- अभिषेक बच्चनची मुलगी आराध्या या पार्टीला हजर राहू शकणार नाही. त्याचप्रमाणे आलिया भट्ट आणि वरुण धवनसुद्धा वाढदिवसाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

एकल पालकत्व स्वीकारणाऱ्या करणच्या आयुष्यात सरोगसीद्वारे यश आणि रुहीचं आगमन झालं होतं. ज्यावेळी त्याने मुलांचं पालकत्व स्वीकारल्याचं जाहीर केलं होतं त्यावेळी अनेकांनीच त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला होता. तेव्हा आता करण जोहर यश आणि रुहीच्या वडिलांच्या भूमिकेत चांगलाच रुळलाय असं म्हणायला हरकत नाही.

First Published on February 7, 2018 12:45 pm

Web Title: karan johar plans big party for yash and roohi first birthday special guests invited